विराट कोहली: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात विश्वचषक २०२३ चा ३७ क्रमांकाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने शानदार खेळ केला, संघाच्या सर्व फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) सचिन तेंडुलकरच्या 49व्या वनडे शतकाची बरोबरी केली.
या सामन्यात त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतकही झळकावले. 35 व्या वाढदिवसानिमित्त विराटने 49 वे शतक झळकावून ते संस्मरणीय केले, त्याने खास पद्धतीने सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
विराट कोहलीने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले,चाहत्यांमध्ये जल्लोष..
49व्या शतकानंतर विराट कोहलीच्या सचिन तेंडुलकरची बरोबरी करताना भावूक, VIDEO व्हायरल विराट कोहलीने हे शतक झळकावण्यासाठी थोडे अधिक चेंडू खेळले, पण अखेर त्याने हा पराक्रम केला. विराटने रबाडाच्या चेंडूवर सिंगल चोरून आपले 49 वे शतक पूर्ण केले आणि जल्लोष साजरा केला. विराट कोहलीने कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते.
अशा परिस्थितीत, त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावणे आणि सचिन तेंडुलकरची बरोबरी करणे हे अनेक अर्थाने खास आहे. २०२३ च्या विश्वचषकातील विराटचे हे दुसरे शतक होते. मेगा इव्हेंटमधील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये तो अप्रतिम कामगिरी करत आहे.
पहा व्हिडीओ,
— akash singh (@akashsingh17654) November 5, 2023
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी