राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला. आयपीएल 2024 मधले हे त्याचे पहिले शतक ठरले. या खेळीत त्याने 113 नाबाद धावा केल्या. या खेळीसह त्याने अनेक विक्रम उध्वस्त करून टाकले. फलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त राहिले. विराटने या सामन्यात सुरेश रैना याचा देखील विक्रम मोडून काढला.
सुरेश रैनाला मागे सोडत विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू ठरला.
- IPL 2024: रवींद्र जडेजाने केली एमएस धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी, सामन्याच्या हिरो ठरल्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया…!
कोहलीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या डावातील 16 व्या षटकात रियान परागचा झेल पकडत हा विक्रम आपल्या नावे केला. विराटने आयपीएल मध्ये आतापर्यंत 110 झेल पकडले आहेत. याबाबतीत किंग कोहलीने सुरेश रैना याला पाठीमागे टाकले आहे.
सुरेश रैना याने इंडियन प्रीमियर लीग मध्ये एकूण 109 झेल पकडले आहेत. कोहली या लीग मध्ये झेलचे शतक करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायरान पोलार्ड आहे, ज्याने आयपीएल मध्ये 109 झेल पकडले आहेत तर रोहित शर्मा याच्या नावे 99 झेल पकडल्याची नोंद असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
यासह, विराट कोहली आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. या खेळीमुळे तो अन्य फलंदाजाच्या तुलनेत खूपच पुढे गेला आहे. अन्य फलंदाजांना 7000 देखील धावा करता आल्या नाही. मात्र विराट कोहलीने 7569 धावा पूर्ण केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. कोहलीने राजस्थान विरुद्ध 34 धावा करत आयपीएलमध्ये साडेसात हजार धावांचा पल्ला गाठणारा खेळाडू ठरला. कोहलीच्या नावे आता आयपीएल मध्ये 242 सामन्यात 7569 धावा झाल्या आहेत. या फलंदाजाने 8 शतक आणि 52 अर्धशतके ठोकलेत.
विराट कोहलीने पूर्ण केल्या टी-२० मध्ये 8000 धावा..!
कोहलीने यासह टी-20 कारकिर्दीमध्ये 8000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आरसीबी कडून खेळताना 242 सामन्यात 7579 धावा केल्या आहेत. त्यासोबत याच फ्रॅंचाईजी संघाकडून खेळताना चॅम्पियन्स लीगमध्ये 15 सामने देखील खेळले आहेत. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने 8000 धावा करण्याचा विक्रम केला आहे. या सामन्यापूर्वी त्याला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 110 धावांची गरज होती. त्याने नाबाद 113 धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.
कोहलीने जयपूर येथे झालेल्या सामन्यांमध्ये 72 चेंडूत 12 चौकार आणि चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद 113 धावांची शतकी खेळी केली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 113 आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस याने 44 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर आरसीबीने वीस षटकात तीन बाद 183 धावा केल्या होत्या. 184 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल बाद झाला. यानंतर जोश बटलर याने नाबाद 100 तर संजू सॅमसन याने 69 धावा ठोकल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने सहा विकेटसने सामना आपल्या नावे केला.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.