5 नोव्हेंबर 1988मध्ये दिल्लीत
जन्मलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याचा आज वाढदिवस आहे. तो आज 34 वर्षांचा झाला आहे. त्याने भारतीय संघाला (Indian Team) क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात नेहमीच मोलाची कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने केले आहेत हे खास पराक्रम-
-2018 ला वेस्ट इंडीज विरुद्ध खेळलेल्या वनडे सामन्यात विराटने 10000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने या 10000 धावा पूर्ण करताना सचिन तेंडूलकरचा सर्वात जलद 10000 वनडे धावा करण्याचा विक्रम तोडला होता.
विराटने फक्त 205 डावांमध्ये 10000 धावा पुर्ण केल्या होत्या तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने(Sachin Tendulkar) 259 वनडे डावात 10000 धावांचा टप्पा पार केला होता.
-2018च्या ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत विराटने सलग 3 वनडे सामन्यात 3 शतके केली होती. सलग 3 वनडे सामन्यात 3 शतक करणारा विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
-एकाच वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराटने 7 वेळा केला आहे. त्याने 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018 आणि 2019 या वर्षी वनडेत प्रत्येकी 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
-टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने कारकिर्दीत 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी20तही सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे.
त्याने हा विक्रम सर्वात कमी 56 डावात पूर्ण केला होता. त्याने मागीलवर्षी मॅनचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना हा विक्रम केला होता. या क्लबमध्ये फक्त 10 फलंदाजांचा समावेश आहे.
– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर 71 शतके आणि 128 अर्धशतके आहेत.
-विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 477 सामन्यांत 24350 धावा केल्या आहेत.
-विराट भारत, दिल्ली, इंडिया रेड, इंडिया अंडर 19, राॅयल चॅलेंजर बेंगलोर या संघांकडून खेळला आहे.
-विराटला आतापर्यंत आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू (2017, 2018), आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम वनडे खेळाडू (2012, 2017,2018), अर्जून अवाॅर्ड (2013), पद्मश्री (2017) आणि राजीव गांधी खेळ रत्न (2018) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.