असा आहे विराट कोहलीचा डायट प्लॅन; फिट राहण्यासाठी 4 वर्षापासून आवडते पदार्थ नाही खात!

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Virat Kohli’s Diet Plan: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य आधारस्तंभ असलेला विराट कोहली हा फलंदाजीत हिट नसून तो आपल्या फिटनेसच्या बाबतीत ही इतर खेळाडूंच्या तुलनेने तंदुरुस्त आहे. मागील काही वर्षापासून त्याने आपल्या फिटनेस मध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे. तो त्याच्या डायटवर विशेष लक्ष देतो.

बटर चिकन मसाला विराट कोहलीची फेवरेट डिश आहे. पण फिटनेस मध्ये कोणती अडचणी येऊ नये, यासाठी गेल्या चार वर्षापासून त्यांनी ते तो पदार्थ खाल्ला नाही, यासोबत तो गोड पदार्थ कटाक्षाने टाळत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहलीला जेवणामध्ये हिरवा पालेभाज्या खायला भरपूर आवडतात. या सर्व उकडलेल्या भाज्या असतात. यात कसल्याही प्रकारच्या मसाल्याचा समावेश नसतो. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.

भारतीय क्रिकेट संघातील या प्रमुख फलंदाजाला सॅलेड खायला आवडते. या सॅलेड मध्ये अँटिऑक्साइड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. विराट कोहली आपल्या लंच मध्ये हाय प्रोटीन देणाऱ्या विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करतो.

विराट शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात हाय प्रोटीन मिळावे यासाठी (राजमा) बीन्स मोठ्या प्रमाणात खातो.

 

कार्बचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी विराट कोहली आपल्या डाएटमध्ये भाताचा देखील समावेश करतो. विराट कोहली साधारण प्रकारचे पाणी पीत नसून तो ब्लॅक वॉटर चे पाणी पितो. जे की फ्रान्समधून येते.

असा आहे विराट कोहलीचा डायट प्लॅन; फिट राहण्यासाठी 4 वर्षापासून आवडते पदार्थ नाही खात!

विराट कोहली नेहमी त्याच्यासोबत ड्रायफ्रूट्स ठेवतो. जे खाल्ल्याने त्याला खूप एनर्जी मिळते. तसेच त्याला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी देखील त्यामुळे मदत होते.

विराटला मांसाहारी खाणे खूप पसंद आहे. डिनरमद्ये मासे तो आवडीने खातो. दुपारच्या लंच मध्ये ग्रील्ड बेकन, ग्रील्ड मासे, पपई खातो. ट्रेनरने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डायट मध्ये सतत बदल होत असतो.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave A Reply

Your email address will not be published.