विराट कोहलीने रचला महाविक्रम, अशी कामगिरी करणारा बनला जगातला एकमेव फलंदाज..!

विराट कोहलीने रचला महाविक्रम, अशी कामगिरी करणारा बनला जगातला एकमेव फलंदाज..!

 

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात काही विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोहलीने जयपूर येथे झालेल्या सामन्यांमध्ये 72 चेंडूत 12 चौकार आणि चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद 113 धावांची शतकी खेळी केली. कोहलीच्या या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने राजस्थानच्या समोर 184 धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. कोहलीने या शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावे केले.

बुमराह-शमी नव्हे तर या गोलंदाजाने आयपीएल मध्ये विराट कोहलीला केले सर्वाधिक वेळा बाद, नाव वाचून व्हाल हैराण..!

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. यासोबतच तो अन्य फलंदाजाच्या तुलनेत खूपच पुढे गेला आहे. अन्य फलंदाजांना 7000 देखील धावा करता आल्या नाही. मात्र विराट कोहलीने 751 धावा पूर्ण केल्या आहेत, अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. कोहलीने राजस्थान विरुद्ध 34 धावा करत आयपीएलमध्ये साडेसात हजार धावांचा पल्ला गाठणारा खेळाडू ठरला. कोहलीच्या नावे आता आयपीएल मध्ये 242 सामन्यात 7569 धावा झाल्या आहेत. या फलंदाजाने 8 शतक आणि 52 अर्धशतके ठोकलेत.

कोहलीने यासह टी-20 कारकिर्दीमध्ये 8000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आरसीबी कडून खेळताना 242 सामन्यात 7579 धावा केल्या आहेत. त्यासोबत याच फ्रॅंचाईजी संघाकडून खेळताना चॅम्पियन्स लीगमद्ये 15 सामने देखील खेळले आहेत. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने 8000 धावा करण्याचा विक्रम केला. या सामन्यापूर्वी त्याला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 110 धावांची गरज होती. त्याने नाबाद 113 धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.

विराट कोहलीने रचला महाविक्रम, अशी कामगिरी करणारा बनला जगातला एकमेव फलंदाज..!

कोहली हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. त्याने याबाबतीमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याला पाठीमागे टाकले. धवनने याच संघाविरुद्ध खेळताना 679 धावा केल्या आहेत. कोहली या सामन्यापूर्वी राजस्थान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज होता. मात्र या शतकी खेळी सह तो सर्वांना पाठीमागे टाकले. कोहलीने राजस्थान विरुद्ध खेळताना 30 सामन्यात 731 धावा केल्या आहेत.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!