IND vs NZ: शतक हुकले तरी विराट कोहलीचा आणखीन एक भीष्म पराक्रम,अशी कामगिरी करणारा ठरला 4 था खेळाडू.

 

विराट कोहली:  रविवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने चार गडी राखून विजय मिळवला. विराट कोहलीने या सामन्यात 95 धावांची धडाकेबाज खेळी करत न्यूझीलंडची गोलंदाजी उध्वस्त केली. षटकार ठोकून शतक पूर्ण करण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याचे शतक 5 धावांनी हुकले, तरी या सामन्यात आणखीन एक भीष्म पराक्रम केला आहे.

IND vs NZ: विराट कोहली ठरला एकदिवशीय सामन्यात 150 झेल घेणारा खेळाडू

वन डे क्रिकेटमध्ये कोहलीने दीडशे झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

2019 च्या विश्वचषक सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडने हरवल्यानंत धोनी, हार्दिक पांड्या, ड्रेसिंग रूममध्ये रडले होते, संघातील सदस्याने केला मोठा खुलासा..

आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला त्याच्या इतके झेल घेता आले नाहीत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने हा पहिल्या स्थानावर आहे. 1988 मध्ये आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या महेलाने 448 वनडे सामन्यात 218 झेल घेतल्याची नोंद आहे. एकाच सामन्यात चार झेल घेण्याचा पराक्रम ही त्याच्या नावावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पॉंटिंग हा दुसऱ्या स्थानावर आहे. 1995 मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पॉटिंगने 375 वनडे सामन्यात 160 झेल घेतले आहेत. 2012 मध्ये तो क्रिकेटमधून निवृत्त झाला. एकाच सामन्यात तीन जल घेण्याचा विक्रम हे त्याच्या नावावर आहे.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने वनडे क्रिकेटमध्ये 156 झेल घेतले आहेत. अझरुद्दीनने 334 सामन्यात हा पराक्रम केला आहे. 1985 मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अझरने 2000 नंतर क्रिकेटला राम राम ठोकला. सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो आता तिसऱ्या स्थानावर आहे. अझर यांचा हा विक्रम मोडीत काढण्यासाठी विराट कोहलीला अजून सात झेल घेणे बाकी आहे.

न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर याने 236 सामन्यात 142 झेल घेतले आहेत. एका सामन्यात चार झेल घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.  त्याने सर्वाधिक झेल स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करताना घेतले आहेत.

IND vs NZ: शतक हुकले तरी विराट कोहलीचा आणखीन एक भीष्म पराक्रम,अशी कामगिरी करणारा ठरला 4 था खेळाडू.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एक उत्कृष्ट फलंदाजांसोबत एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक देखील होता. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये वनडेत 140 झेल घेतले आहेत.

न्यूझीलंडचा सर्वात चतुर समजला जाणारा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने त्याच्या वनडे कारकिर्दीमध्ये 133 झेल घेतले आहेत. फ्लेमिंगने सर्वाधिक झेल स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करताना घेतले आहेत.  दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलीस 131, पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज युनूस खान तसेच श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपट्टू मुथया मुरलीधरन या दोघांनी प्रत्येकी 130 झेल घेतले आहेत.


हेही वाचा: