विराटचे शतक एक , विक्रम झाले अनेक! एकाच सामन्यात कोहलीने मोडले एवढे विक्रम…!

विराटचे शतक एक , विक्रम झाले अनेक! एकाच सामन्यात कोहलीने मोडले एवढे विक्रम...!

विराट कोहली:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात काही विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोहलीने जयपूर येथे झालेल्या सामन्यांमध्ये 72 चेंडूत 12 चौकार आणि चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद 113 धावांची शतकी खेळी केली. कोहलीच्या या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने राजस्थानच्या समोर 184 धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात राजस्थानने पाच चेंडू आणि सहा गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. कोहलीने या शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्या विक्रमांवर एक नजर टाकूया.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, सुरेश रैनाला मागे सोडत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू...

राजथान विरुद्धच्या सामण्यात विराट कोहलीने मोडले हे विक्रम..

1) राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने 72 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी केली. विराट कोहलीचे आयपीएल मधील हे आठवे शतक आहेत. कोहलीने जोस बटलर आणि क्रिस गेल यांच्यापेक्षा दोन शतके जास्त ठोकले आहेत.

2) आयपीएल मधील विराट कोहलीची 113 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

3) टी 20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोहलीच्या नावे आता नऊ शतकांची नोंद झाली आहे. यापूर्वी दोनच खेळाडूंनी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकली आहेत. ख्रिस गेलच्या नावे 22 तर बाबर आजम याच्या नावे अकरा शतकांची नोंद आहे.

4) विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या सामन्यांमध्ये 67 चेंडूमध्ये सेंचुरी पूर्ण केली. आयपीएल मधले हे सर्वात स्लो शतक ठरले. आयपीएल मध्ये यापूर्वी मनीष पांडे यांनी डेक्कन चार्जेस विरुद्ध खेळताना 67 चेंडू मध्ये शतक पूर्ण केले होते. आयपीएल मध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. विशेष म्हणजे आरसीबी कडून खेळतानाच त्याने हे शतक ठोकले होते.

5) विराट कोहलीने हे शतक ठोकण्यासाठी सर्वाधिक 67 चेंडू घेतले. यापूर्वी यश नेहराने 2021 मध्ये गोवा विरुद्ध खेळताना शतक पूर्ण करण्यासाठी 68 चेंडू खेळले.

रन मशीन विराट कोहलीची अशी आहे आयपीएल मधील क्रिकेट कारकीर्द! वाचा डेब्यू सामन्यात किती काढल्या होत्या धावा?

6) कोहलीने यासह टी-20 कारकिर्दीमध्ये 8000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आरसीबी कडून खेळताना 242 सामन्यात 7579 धावा केल्या आहेत. त्यासोबत याच फ्रॅंचाईजी संघाकडून खेळताना चॅम्पियन्स लीगमद्ये 15 सामने देखील खेळले आहेत. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने 8000 धावा करण्याचा विक्रम केला. या सामन्यापूर्वी त्याला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 110 धावांची गरज होती. त्याने नाबाद 113 धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.

7) कोहली हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. त्याने याबाबतीमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याला पाठीमागे टाकले. धवनने याच संघाविरुद्ध खेळताना 679 धावा केल्या आहेत. कोहली या सामन्यापूर्वी राजस्थान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज होता. मात्र या शतकी खेळी सह तो सर्वांना पाठीमागे टाकले. कोहलीने राजस्थान विरुद्ध खेळताना 30 सामन्यात 731 धावा केल्या आहेत.

विराटचे शतक एक , विक्रम झाले अनेक!  एकाच सामन्यात कोहलीने मोडले एवढे विक्रम...!

या सामन्यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 113 आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस याने 44 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर आरसीबीने वीस षटकात तीन बाद 183 धावा केल्या होत्या. 184 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल बाद झाला. यानंतर जोश बटलर याने नाबाद 100 तर संजू सॅमसन याने 69 धावा ठोकल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने सहा विकेटसने सामना आपल्या नावे केला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…