भारताचा एकमेव खेळाडू ज्याने 2 वेळा फलंदाजाला 99 धावांवर बाद केलं, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.
भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोकांना क्रिकेट चे वेड आहे. देशातील 70 टक्के लोकांना क्रिकेट चे वेड आहे. आणि दिवसेंदिवस क्रिकेट चे वेड हे वाढतच चालले आहे. क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी फॉर्म खूप गरजेचां आहे.

जर खेळाडूचा फॉर्म चांगला असेल तरच त्या खेळाडूला पुढील सामन्यात खेळवले जाते नाहीतर त्याला बाहेर ठेवले जाते. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने 2 चांगल्या फलंदाजाला 99 धावांवर बाद करून त्यांना शतक मारण्यापासून थांबवले आहे.
भारतीय संघात अनेक असे खेळाडू आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आक्रमक फलंदाजी तसेच जबरदस्त गोलंदाजी साठी भारतातील ठराविक खेळाडू हे नेहमीच चर्चेत राहतात हे तुम्हाला माहीतच आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग माहीतच असेल. वीरेंद्र सेहवाग हा आक्रमक फलंदाज तसेच गोलंदाज सुद्धा होता. भारतीय संघामध्ये ऑल राऊंडर म्हणून सेहवाग ला ओळखले जायचे.
भारतीय संघातील वीरेंद्र सेहवाग हा चांगला फलंदाज होताच त्याचबरोबर चांगला गोलंदाज सुद्धा होता. वीरेंद्र सेहवाग ने दोन चांगल्या फलंदाजांना 99 धावांवर बाद करून त्यांचे शतक हुकवले आहे.
2001 साली वीरेंद्र सेहवाग ने बेंगलोर येथे खेळलेल्या एका वन डे सामन्यात ऑस्ट्रेलिया चा फलंदाज मैथ्यू हेडन या फलंदाजाला 99 धावांवर बाद करून पेवेलियान चा रस्ता दाखवला तसेच एका धावेमुळे शतक हुकले.
यानंतर कोका कोला कप मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळलेल्या सामन्यात श्रीलंका संघाचा आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या या खेळाडू ला वीरेंद्र सेहवाग ने 99 धावांवर बाद केले. तसेच वीरेंद्र सेहवाग सुद्धा 1 वेळा 99 धावांवर बाद झाले आहेत. अश्या प्रकारे 2 वेळा वीरेंद्र सेहवाग ने खेळाडूंना 99 धावांवर बाद करून त्यांचे शतक हलवले आहे.