Cricket Records: सध्या जगातील कोणताही संघ टीम इंडियाला घाबरतो. कारण अलीकडच्या काळात भारतातून असे क्रिकेटपटू उदयास आले आहेत ज्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. स्पर्धा कोणतीही असो, भारतीय संघ वर्चस्व गाजवत आहे. सध्या विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जात आहे.
विक्रमांच्या बाबतीतही भारतीय फलंदाजांमध्ये तोड नाही. टीम इंडियाच्या फलंदाजांच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक विक्रम आहेत, जे मोडणे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असेल. या विक्रमांमुळेच जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नाव आहे. भारतीय फलंदाजांच्या नावावर अनेक विक्रम असले तरी आज आम्ही तुम्हाला एका खास विक्रमाबद्दल सांगणार आहोत.
Cricket Records: या भारतीय खेळाडूने डावाची सुरवात करतांना पहिल्याच चेंडूवर मारलेत सर्वाधिक षटकार,
डावाच्या पहिल्या चेंडूवर एकूण सात षटकार ठोकणारा एक भारतीय फलंदाज आहे. अशी कामगिरी करणारा हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.आम्ही बोलत आहोत भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागबद्दल. होय, जागतिक क्रिकेटमध्ये सेहवागचा डावाच्या पहिल्या चेंडूवर 10 वेळा षटकार मारण्याचा अतुलनीय विक्रम आहे.
वीरेंद्र सेहवागने आता जागतिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र सेहवागचा हा विक्रम निवृत्तीनंतरही अबाधित आहे. सेहवागने त्याच्या कारकिर्दीत 10 वेळा पहिल्या चेंडूवर षटकार मारला आहे,ज्याची बरोबरी आजपर्यंत कोणताही फलंदाज करू शकला नाहीये.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३०९ धावांची धमाकेदार इ निंग खेळल्यानंतर सेहवागला जागतिक क्रिकेटमध्ये मुलतानचा सुलतान ही पदवी मिळाली. त्यानंतर तो मुलतानचा सुलतान या नावाने जगभर प्रसिद्ध झाला.
आपल्या कसोटी कारकिर्दीत वीरेंद्र सेहवागने 104 सामने खेळताना 82.23 च्या स्ट्राइक रेटने 8586 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 251 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 104.34 च्या स्ट्राइक रेटने 8273 धावा केल्या आहेत. सेहवागने T-20 क्रिकेटमध्ये 145.39 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..