VIRAL VIDEO: वॉशिंग्टन सुंदरने एका हाताने घेतला जबरदस्त झेल, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी मार्क चॅपमनचा अप्रतिम झेल टिपला.
वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियासाठी पाचवे षटक टाकतांना हा झेल घेतला. या षटकात सुंदरने प्रथम फिन अॅलनला पायचीत केले. त्यानंतर त्याच षटकात मार्क चॅपमनला अप्रतिम झेल देऊन तंबूत पाठवले फलंदाजाने चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटला लागून हवेत गेला. चेंडू त्याच्या बाजूने जात असल्याचे पाहून सुंदरने त्यावर जोरदार झेल घेतला आणि हवेत उडत एका हाताने अशक्यप्राय झेल घेतला. वॉशिंग्टन सुंदरने मार्क चॅपमनला शून्यावर बाद केले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने 6 षटकात 2 गडी गमावून 47 धावा केल्या आहेत. ग्लेन फिलिप्स 2, तर डेव्हॉन कॉनवे 7 धावा करून खेळत आहे. फिन अॅलन २३ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला, तर मार्क चॅपमनला खातेही उघडता आले नाही.
दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू:
Wow!!🥵 What a catch from Washington Sundar
Absolutely Stunning 💥💥 #starniadugu@StarSportsTel #INDVsNZT20 @Sundarwashi5 pic.twitter.com/P15G9XXyJi— PADAKANTI SHIVARAM (@PADAKANTISHIVA9) January 27, 2023
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर (क), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
भारत (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (क), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग
पहा व्हिडीओ:
WHAT. A. CATCH 🔥🔥@Sundarwashi5 dives to his right and takes a stunning catch off his own bowling 😎#TeamIndia | #INDvNZ
Live – https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/8BBdFWtuEu
— BCCI (@BCCI) January 27, 2023
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव