IPL 2024, Wasim Jaffer : माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने हा नियम भारतीय क्रिकेटसाठी चिंतेचा विषय असल्याचेही म्हटले आहे. जाफरने सोशल मीडियावर इम्पॅक्ट प्लेअरबाबत आपले मत व्यक्त केले. आयपीएल (IPL-2024) च्या पुढील सीझनचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.
IPL 2024: Wasim Jaffer ने केली हा नियम काढून टाकण्याची मागणी.
45 वर्षीय वसीम जाफरला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून इम्पॅक्ट प्लेयर नियम काढून टाकण्याची इच्छा आहे. मुंबईसाठी दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या जाफरने कबूल केले की, अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आणि गोलंदाजी न करणे ही भारतीय क्रिकेटसाठी चिंतेची बाब आहे.
IPL 2024: हा नियम 2023 पासून सुरू झाला.
IPL (IPL-2023) च्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला होता. यामुळे संघांना सामन्यादरम्यान खेळाडू बदलता येतो. जाफरने त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केले – ‘मला वाटते की आयपीएलला ‘IMPACT PLAYER’ नियम काढून टाकणे आवश्यक आहे, कारण ते अष्टपैलू खेळाडूंना अधिक गोलंदाजी करण्यास प्रोत्साहित करत नाही. अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आणि गोलंदाजी न करणे ही भारतीय क्रिकेटसाठी चिंतेची बाब आहे.
‘IMPACT PLAYER’ नियम नक्की काय आहे?
या नियमानुसार, प्लेइंग-11 व्यतिरिक्त, दोन्ही संघ जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंना नामनिर्देशित करू शकतात. यापैकी कोणत्याही खेळाडूला डाव सुरू होण्यापूर्वी, षटक संपल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतर आणि फलंदाज निवृत्त झाल्यावर कर्णधार मैदानात उतरू शकतो. तुषार देशपांडे हा लीग इतिहासातील पहिला’IMPACT PLAYER’ ठरला, जेव्हा त्याला अंबाती रायडूच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते.
वसीम जाफरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय, त्याने 260 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 57 शतके ठोकून एकूण 19410 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..