Scribbled Underline 2

IND vs NZ: 20 वर्षाचा इतिहास बदलणार? टीम इंडिया आज न्यूझीलंडला हरवणार? 

Rahul Kulkarni

विश्वचषक स्पर्धेत आज रविवारी  भारत आणि न्यूझीलंड पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ एकदाही न्यूझीलंडला पराभूत करू शकलेला नाहीये. आज  भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

महत्वाचे म्हणजे आतापर्यंत विश्वचषक   2023 स्पर्धेमध्ये दोन्ही संघ   एकदाही पराभूत झालेले नाहीत.

सध्या दोन्ही संघाचे समान गुण आहेत,  पण रनरेट सरस असल्यामुळे  न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर आहे.

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड  संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने  झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने  पाच सामन्यात बाजी मारली आहे.  तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले.

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड  संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने  झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने  पाच सामन्यात बाजी मारली आहे.  तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले.

भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी करत विजयाचा चौकार लावला आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत भारताने आठ गुणांची कमाई केली आहे.

न्यूझीलंडचे गोलंदाज 2003 पासून नेहमीच भारतीय फलंदाजावर  हावी झाले आहेत. 2003 पासून भारत एकदाही न्यूझीलंडला विश्वचषकामध्ये पराभूत करू शकला नाहीये.

न्यूझीलंडचे फलंदाजही सध्या जोरदार  फोर्ममध्ये आहेत. त्यामुळे आजचा  सामना हा  नक्कीच जबरदस्त होणार.

विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक  झेल घेणारे भारतीय खेळाडू.

swipe up