BY- MRUNAL KULKARNI
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावा काढणाऱ्या खेळाडूंविषयी आज आपण या स्टोरीमध्ये माहिती घेणार आहोत..
IMAGE- INSTAGRAM
IMAGE- INSTAGRAM
वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने 2015 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध खेळताना 215 धावांची नाबाद ऐतिहासिक खेळी केली होती तसेच विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
IMAGE- INSTAGRAM
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कस्टर्न यांनी 1996 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत यु ए ई विरुद्ध खेळताना 188 धावांची नाबाद खेळी केली होती. निवृत्तीनंतर कस्टर्न यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.
IMAGE- INSTAGRAM
भारताचा माजी कर्णधार व डॅशिंग खेळाडू सौरव गांगुली याने 1999 साली इंग्लंड मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध दमदार खेळी केली होती. सौरवने या सामन्यात 183 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.
IMAGE- INSTAGRAM
वेस्टइंडीजचा माजी दिग्गज खेळाडू व्ही व्ही एन रिचर्ड्स यांनी 1987 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंके विरुद्ध खेळताना 181 धावांची सर्वात मोठी खेळी केली होती.
IMAGE- INSTAGRAM
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 178 धावांची मोठी खेळी केली होती. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.
IMAGE- INSTAGRAM
भारताचा चॅम्पियन खेळाडू कपिल देव याने 1983च्या विश्वचषक स्पर्धेत झिंबाब्वे विरुद्ध खेळताना 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या मनात आजही घर करून आहे.
IMAGE- INSTAGRAM
IMAGE- INSTAGRAM