- Advertisement -

करोडोंची प्रॉपर्टी असूनही वेस्ट इंडिज चा फिरकीपटू ‘सुनील नारायण’ या कारणामुळे आजूनही 2 रूम असलेल्या घरात राहतोय ..

0 1

‘करोडोंची प्रॉपर्टी असूनही वेस्ट इंडिज चा फिरकीपटू ‘सुनील नारायण’ या कारणामुळे आजूनही 2 रूम असलेल्या घरात राहतोय ..


Simplicity is the ultimate sophistication,’ हे लिओनार्डो दा विंचीच्या या वाक्याचं पालन करणं जरा कठीणच आहे नाही? अन् जर तुम्ही कोट्यावधी रुपये कमवणारे एखादे खेळाडू असाल तर मग महाकठीण. घर, गाडी म्हणा किंव कपडे म्हणा, कुठल्यानं कुठल्या गोष्टीतून आपली श्रीमंत दिसून येतेच. मात्र, एक खेळाडू असा आहे, जो कोट्यवधी रुपयांची कमाई करत असूनही केवळ दोन खोल्यांच्या घरामध्ये राहतो! हो, अतिशयोक्त वाटत असली तरी ही गोष्ट एकदम खरी आहे.

सुनिल नरेन, असं या खेळाडूचं नाव आहे. सुनिल वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील अनेक खेळाडू आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. मात्र, सुनिल नरेन त्यांच्यापेक्षाही वेगळा आहे. शांत आणि संयमी स्वभाव असलेल्या सुनिलचं राहणीमान अतिशय साधं आहे.

इंडियन प्रिमियर लीगमधील कोलकाता नाइटराइडर्सच्या फ्रँचायझीनं सुनिल नरेला १२.५ कोटी रुपये किंमत देऊन रिटेन केलं होतं. कोलकात्यानं रिटेन केलेल्या मोजक्या दोन खेळाडूंमध्ये नरेनचा समावेश होता. कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा कुठलाही व्यक्ती घर आणि गाडी या दोन गोष्टी तर नक्कीच खरेदी करेल. या गोष्टीमध्ये बहुदा कुणाला शंका नसावी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Narine (@sunilnarine24)

मात्र, सुनिल नरेल याला अपवाद ठरला आहे. तो आजही आपल्या वडिलांनी खरेदी केलेल्या घरामध्ये राहतो. दोन खोल्या असलेलं हे घर सुनिलचे वडील शादीद नरेन यांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केलेलं आहे. सुनिलच्या या घराची आणखी एक खासीयत आहे. त्याचं संपूर्ण घर गुलाबी रंगाचं आहे! वस्तुंच्या रंगांबद्दल पॅशनेट असणं ही काही अगदी असामान्य गोष्ट नाही. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री बॉलर सुनिलचं गुलाबी रंगावर असलेलं प्रेम एकदम ‘नेक्स्ट लेवल’ आहे. म्हणून त्यानं आपल्या घराला देखील गुलाबी रंग दिला आहे. त्याचा सहकारी आणि मित्र रोव्हमन पॉवेलनं ही गोष्ट सांगितली होती.

 

 

२६ मे १९८८ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोतील अरिमामध्ये सुनीलचा जन्म झाला. त्याचे वडील शादीद नरीन एका रेस्टॉरन्टसाठी ड्रायव्हरचं काम करत होते तर आई क्रिस्टीना मुलांचा सांभाळ करत होती. सुनीलचे वडील महान भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांचे मोठे चाहते होते. जेव्हा गावस्कर वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात, तेव्हा शादीद आपल्या देशाला सपोर्ट करण्याऐवजी भारतीय संघाला चीयर करत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव सुनील ठेवलं.

 

 

इतकंच काय तर मुलीचं नाव देखील सुनीली ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, त्यांची पत्नी क्रिस्टीना यांनी या गोष्टीला नकार दिला. आपल्या मुलाला देखील क्रिकेटची आवड असून त्याच्या अंगात प्रतिभा आहे, ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी सुनिलला वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली.

स्पायकी हेअरस्टाईल असलेल्या सुनीलनं २००९ मध्ये अंडर-१९ च्या एका चाचणी सामन्यात सर्व दहाच्या दहा विकेट्स घेऊन पहिल्यांदा सर्वांचं लक्ष वेधून घेतल होतं. त्यानंतर त्याला तत्काळ त्रिनिदाद आणि टोबॅगो संघात खेळण्यासाठी बोलवण्यात आलं. उजव्या हाताच्या ऑफ स्पिनर असलेल्या सुनिलनं वेस्ट इंडीज अंडर -१९ संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि लीवार्ड आयलंडविरुद्ध खेळून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

२००९ मध्ये भारतात झालेल्या पहिल्या ट्वेंटी-ट्वेंटी चॅम्पियन्स लीगसाठी त्याला वेस्ट इंडिजच्या मुख्य चमूमध्ये घेण्यात आलं होतं. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०११ मध्ये तो कॅरेबियन टी-ट्वेंटी लीगमध्ये खेळला. या स्पर्धेत त्यानं १३.४० च्या सरासरीनं ५ बळी घेतले. मात्र, त्याची बॉलिंग ॲक्शनमध्ये त्रूटी असल्याची चर्चा रंगली.

सुनील नारायण

त्यानंतर त्याला काही दिवस पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील बायो मेकॅनिकल एक्सपर्टकडे पाठवण्यात आलं. चॅम्पियन्स लीगमध्ये त्यानं आपल्या सुधारित बॉलिंग ॲक्शनचा चांगला प्रभाव निर्माण केला. लीगमध्ये त्यानं १०.५० च्या सरासरीनं दहा विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच वर्षाच्या अखेरीस, त्यानं भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेत वेस्ट इंडिजला १६ धावांनी विजय मिळवून दिला.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नरेननं सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळं कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी त्याच्याकडे आकर्षित झाली. २०१२ च्या आयपीएल लिलावात त्याला ७ लाख अमेरिकन डॉलर्स किंमत देऊन कोलकात्यानं खरेदी केलं. त्यानं आपली निवड सार्थ ठरवली आणि सिझनमध्ये २४ विकेट्स घेतल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या योगदानामुळे कोलकात्याला पहिलं आयपीएल विजेतेपद मिळण्यास मदत झाली.

नरेनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवडण्यात आल होतं. त्यानंतर जून २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी विशेष नेत्रदीपक राहिलेली नाही. २०१३ चा आयपीएल सिझन देखील नरेनसाठी चांगला ठरला. त्यानं १६ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. मात्र, कोलकात्याच्या खराब कामगिरीमुळे संघ लवकरच बाहेर पडला. नरेनचं गोलंदाजी तंत्र फसवं होतं. त्याच्या बळावर त्यानं अनेक फलंदाजांना चकवलं होतं.

नियमित ऑफ स्पिन, कॅरम बॉल, द दूसरा, नकल बॉल आणि निफ्टी स्ट्रायटर अशा कितीतरी घातक अस्त्रांचा त्याच्या गोलंदाजी भात्यामध्ये समावेश आहे. त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जम बसवल्यानंतर २०१४ च्या चॅम्पियन्स लीग दरम्यान आयसीसीनं संशयास्पद गोलंदाजी ॲक्शन असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हापासून तो सातत्यानं त्यावर काम करत आहे.

नरेन सध्या जगभरातील वेगवेगळ्या टी ट्वेंटी लीगमध्ये खेळत आहे. परंतु राष्ट्रीय संघानं अद्याप त्याची फारशी दखल घेतलेली नाही. विविध लीगमधून त्याची कोट्यवधी रुपयांची कमाई होते. मात्र, त्यानं आपला राहणीमानातील साधेपणा सोडला नाही. हे त्याच्या दोन खोल्यांच्या घरावरून सिद्ध होतं.


हे ही वाचा..

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Leave A Reply

Your email address will not be published.