मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना 234 धावा केल्या अखेरच्या पाच षटकात टीम डिव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी आक्रमक फलंदाजी करत 96 धावा जोडल्या. शेफर्डने शेवटच्या षटकांमध्ये 32 धावा काढत एक जागतिक विक्रम आपल्या नावात नावे केला. शेफर्डने दिल्लीचा वेगवान गोलंदाज नॉर्टजे याला याच्यावर निशाणा साधत एकाच षटकात चार षटकार आणि दोन चौकार लगावले.
वेस्टइंडीजच्या या युवा खेळाडूंने पहिल्याच चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारत चौकार मारला तर दुसऱ्या चेंडूवर लॉग ऑन ला उत्तुंग षटकार मारला. रोमारियो शेफर्ड आक्रमक फलंदाजी करताना ड्रेसिंग रूममध्ये बसलेला कर्णधार हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा सह सर्व खेळाडू स्तब्ध झाले. सचिन तेंडुलकरने शेफर्ड ची बॅटिंग पाहून त्याचे कौतुक करताना दिसून आला.
तसेच हार्दिक पांड्याची रिएक्शन देखील सोशल मीडियावर वायरल होत गेली. शेफर्डने 39 धावांची खेळी करून मुंबईची धावसंख्या 200 च्या पुढे पोहोचवले. त्याने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईचा संघ दिल्ली समोर 235 धावांचे विजयी लक्ष समोर ठेवले. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईने यंदाच्या हंगामातला पहिला विजय मिळवला.
शेफर्डने 10 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी केली. यासह यंदाच्या हंगामामध्ये मुंबईने सर्वात मोठा चौथा स्कोर उभा केला. तसेच वानखेडेच्या मैदानावर देखील ही सर्वोच्च धावसंख्या ठरले. नॉर्टजे ने चार षटकात दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतले. या गोलंदाजांनी चार षटकात 65 धावा दिल्या. याने चार षटकात दोन महत्त्वपूर्ण विकेट जरूर घेतले पण त्याची सरासरी सर्वाधिक ठरली.
तत्पूर्वी रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात तो बाद झाला. ईशान किशन ने 23 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी केली. हार्दिक पांड्याने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने तीस चेंडूत 39 धावाकडून बाद झाला. अठराव्या ओव्हर मध्ये हार्दिक ची विकेट पडली. त्यानंतर टीम डेव्हिड मैदानात उतरला त्यानेही आक्रमक फलंदाजी करत 21 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. दुखापतीतून मैदानात परतलेला सूर्यकुमार यादव याला भोपळा देखील फोडता आला नाही. त्याने त्याच्या चाहत्यांना निराश केले.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.