सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या कुठे आहे? वाचा एक स्पेशल रिपोर्ट!

0
3
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या कुठे आहे? वाचा एक स्पेशल रिपोर्ट!

अर्जुन तेंडुलकर: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 17 व्या हंगामामध्ये आतापर्यंत 20 पेक्षा अधिक सामने होऊन गेले आहेत. या लीग मधील फेवरेट टीम मुंबई इंडियन्स ने रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी शानदार विजय मिळवत दोन गुणांची कमाई केली. यंदाच्या हंगामा मधला हा पहिला विजय ठरला.

मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक चाहत्यामध्ये सध्या एक प्रश्न चर्चिला जात आहे, तो म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या हंगामामध्ये खेळताना दिसून येत नाही, तो नेमका कुठे आहे? मागील हंगामामध्ये अर्जुन तेंडुलकर याने चार सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला होता, मात्र यंदाच्या हंगामामध्ये एकाही सामन्यात त्याला अंतिम 11 जणांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या कुठे आहे? वाचा एक स्पेशल रिपोर्ट!

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचाईजीने अर्जुन तेंडुलकर याला संपूर्ण हंगामासाठी संघा बाहेर ठेवले आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचा परफॉर्मन्स. यंदाच्या रणजी हंगामामध्ये अर्जुन तेंडुलकर याला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये देखील त्याला संधी मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

अर्जुन तेंडुलकर 2021 पासून मुंबई इंडियन्सच्या संघात आहे. पण त्याला आयपीएल मध्ये पदार्पण करण्याची संधी उशिरा मिळाली. आयपीएल 2023 मध्ये केकेआर विरुद्ध 16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यांमध्ये अर्जुनने आयपीएल मध्ये पदार्पण केले होते. मागील हंगामात त्याला चार सामने खेळता आले. त्यात तो केवळ तीनच गडी बाद करू शकला. 24 वर्षांचा अर्जुन संघात अष्टपैलू म्हणून खेळतोय तो चार सामन्यात केवळ 13 धावा करू शकला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here