Where is hardik pandya: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी ही चर्चा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे होत आहे. याआधी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. त्याचा पत्नीसोबत घटस्फोट आणि त्यानंतर जस्मिन वालियासोबतच्या त्याच्या कथित अफेअरच्या बातम्यांनी लोकांना धक्काच बसला.
आता हार्दिकची चर्चा का होत आहे? (Where is hardik pandya)
टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya)सध्या सुट्टीवर आहे. हार्दिक पांड्याने अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका खेळली आहे. यानंतर टीम इंडियाने 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये हार्दिक पांड्या संघाचा भाग नव्हता. हार्दिक पांड्या टी-20 क्रिकेट मालिकेपासून सुट्टीचा आनंद घेत आहे. हार्दिक पांड्याने अलीकडेच ग्रीसचा एक सुंदर फोटो शेअर केला होता, त्यानंतर दोन दिवसांनी मॉडेल आणि गायिका जास्मिन वालियानेही त्याच ठिकाणचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या.
दरम्यान, हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा एकदा त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो पाण्यात डुंबताना दिसत आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडूचा हा फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे, ज्यावर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तथापि, हार्दिक पांड्याने या फोटोचे लोकेशन उघड केले नाही, ज्यामुळे तो ग्रीसनंतर या दिवसात कुठे सुट्टी घालवत आहे हे माहित नाही.
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पांड्या मैदानात परत येऊ शकतो. भारत आणि बांगलादेश विरुद्धचे हे 3 टी-20 सामने 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये, 9 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये आणि 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवले जातील. याआधी 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, पण हार्दिक पांड्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही. 2018 मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?