अरजित सिंगचे गाणे ते तमन्ना भाटीयाचा भन्नाट डान्स…! World Cup 2023 च्या उद्घाटन सोहळ्यात ‘हे’ बॉलीवूड सेलिब्रिटी दाखवणार आपल्या अदा, बीसीसीआयने शेअर केली लिस्ट..

0
46

अरजित सिंगचे गाणे ते तमन्ना भाटीयाचा भन्नाट डान्स…! World Cup 2023 च्या उद्घाटन सोहळ्यात ‘हे’ बॉलीवूड सेलिब्रिटी दाखवणार आपल्या अदा, बीसीसीआयने शेअर केली लिस्ट..


ICC पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI MEN’S World Cup 2023) सुरु होण्यासाठी केवळ 3दिवस बाकी आहेत. जवळपास सर्वच 10 देशाचे संघ हे भारतात  दाखल झाले आहेत. त्यांच्यामध्ये सध्या सराव सामने देखील खेळवले जात आहेत. अश्यातच आता आयसीसीने विश्वचषकाच्या उद्घाटन समारोहसाठी (world Cup 2023 Opening Ceremoney) जय्यत तयारी सुरु केली आहे.

ICC ODI MEN’S World Cup 2023 ची धमाक्यात सुरुवात करण्यासाठी आयसीसी एक भव्य असा कार्यक्रम आयोजित करणार आहे. ज्यात बीसीसीआय त्यांची मदत करणार आहे. या मोठ्या उद्घाटन सोहळ्यात फटाक्यांच्या आतषबाजीसह काही दिग्गज बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री,गायक आपला परफॉरमन्स सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला दाखवणाऱ्या सिने अभिनेत्री, अभिनेत्यांची यादी जर आजून बीसीसिआयने जाहीर केली नसली तरीदेखील मिडिया रिपोर्टनुसार या कार्यक्रमामध्ये बॉलीवूडचे गाजलेले चेहरे आपली कला सदर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 4 ऑक्टोबर 2023 रोजी नियोजित होणारा उद्घाटन सोहळा हा क्रिकेट आणि मनोरंजनाचा उत्तम मेळ घालणारा भव्य सोहळा असेल. या कार्यक्रमासाठी आयसीसी कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे.

विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहात हे सेलेब्रिटी दाखवणार आपली कला (celebrities likely to perform in ICC ODI mens Cricket World Cup 2023 opening ceremony)
Image Courtesy- Instagram/ Cricket addicts

चला तर या विशेष लेखामध्ये  जाणून घेऊया बीसीसीआयने नक्की कसा उद्घाटन समारोह करण्याचे ठरवले आहे? आणि कोण कोणते बॉलीवूड चेहरे या कर्यक्रमात आपली कला दाखवणार आहेत.

विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहात हे सेलेब्रिटी दाखवणार आपली कला (celebrities likely to perform in ICC ODI mens Cricket World Cup 2023 opening ceremony)

 

1. रणवीर सिंग (Ranveer Singh)

 

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)  त्याच्याजबरदस्त एनर्जीमुळे ओळखला जातो,विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहामध्ये तो त्याच्या बहारदार नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. रणवीरसिंग आणि क्रिकेट यांचे याआधी ही संबंध आहेत. “83” या चित्रपटात दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारण्याची कामगिरी त्याने केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नव्हता..

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

 2. अरिजित सिंग ( Arjit Singh)

भारतातील सर्वात ख्यातनाम पार्श्वगायकांपैकी एक असलेल्या अरिजित सिंगच्या (Arjit Singh) भावपूर्ण सुरांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने भारतात आणि जगभरात त्याचे करोडो चाहते निर्माण झाले आहेत. विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहामध्ये अरजित सिंगचा आवाज घुमणार हे जवळपास निच्छित झाले आहे.  या सोहळ्याचे मुख्य आकर्षण अरजित असेलम असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. महत्वाच म्हणजे गेल्या वर्षी अर्जित सिंगने शेवटच्या वेळी आयपीएल २०२३ च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म केला होता.

 

3.तमन्ना भाटिया ( TamannaSh Bhatia)

एकदिवशीय विश्वचषकाच्या उद्घाटन समारोहमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया ( TamannaSh Bhatia) देखील तिच्या अदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तमन्ना भाटिया, तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाणारी अष्टपैलू अभिनेत्री आहे जी  या कार्यक्रमात ग्लॅमर आणि मोहकता जोडेल.   तमन्नाने आजवर चित्रपटामध्ये केलेल्या धमाकेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ती अधिराज्य गाजवत आहे.

विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहात हे सेलेब्रिटी दाखवणार आपली कला (celebrities likely to perform in ICC ODI mens Cricket World Cup 2023 opening ceremony)
Image Courtesy- Instagram

मुख्य स्टार्सनंतर इतरही काही  मान्यवर करणार मनोरंजन..

 

 

या कार्यक्रमामध्ये अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री तमन्ना भाटीया, गायक अरजित सिंग यांच्याशिवाय इतरही काही मुख्य आकर्षण असणार आहे. बीसीसीआयने या कार्यक्रमासाठी खास LED Laser Light Show चे आयोजन केले आहे. शिवाय फटाक्यांची जोरदार आतषबाजीसुद्धा या कार्यकर्माचे आकर्षण असेल . शिवाय एक विशेष असे  व्हिज्युअल एक्स्ट्रागांझा बनवेल जाईल जे क्रिकेट आणि राष्ट्रांमधील एकतेचा उत्सव साजरा करेल.

वर नमूद केलेल्या सेलिब्रिटींशिवाय, दिग्गज आशा भोसले, बॉलीवूडची नाइटिंगेल श्रेया घोषाल, प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार शंकर महादेवन आणि हार्ट-थ्रॉब वरुण धवन हे देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने त्यांना संपर्क साधला असून अद्याप त्याची नावे निच्छित झाली नाहीत.

ICC ODI Men’s Cricket World Cup 2023 Opening Ceremony Guest List 

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे उच्च अधिकारी अहमदाबाद येथे ICC ODI विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. ICC आणि BCCI ने गुरुवार, 5 ऑक्टोबर रोजी क्रिकेट जल्लोष सुरू होण्यापूर्वी मनोरंजन कार्यक्रमासाठी सर्व क्रिकेट बोर्डांच्या उच्च प्रशासकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या कार्यक्रमासाठी दिग्गज अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती बीसीसीआयने भारतीय मिडिया माध्यमांना दिली आहे.

विश्वचषक 2023 च्या उद्घाटन समारोहात हे सेलेब्रिटी दाखवणार आपली कला (celebrities likely to perform in ICC ODI mens Cricket World Cup 2023 opening ceremony)

 

ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 ही स्पर्धेची 13वी आवृत्ती आहे आणि उद्घाटन समारंभाचे उद्दिष्ट पुढील काही आठवड्यांत होणार्‍या एका रोमांचक स्पर्धेसाठी स्टेज सेट करणे हे आहे. जगभरातील क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असल्याने एकदिवशीय विश्वचषक उद्घाटन सोहळा एकदम थाटामाटामध्ये  पार पाडण्याची संपूर्ण जय्यत अशी तयारी यावेळी करण्यात आली आहे.

 

FAQ

  • वर्ल्डकप 2023 किती दिवस चालणार आहे? (How log day world cup will play?)

आयीसी विश्वचषक 2023 (icc Odi Wolrd cup 2023)  5 ऑक्टोबर पासून सुरु होत असून. यात ऐकून 44 दिवस सामने खेळवले जाणार आहे. 48 एकदिवशीय सामने या विश्वचषकामध्ये खेळवले जाणार आहेत.

  • वर्ल्डकप 2023 कुठे खेळवला जानार आहे? (Where is ICC 2023 World Cup schedule?)

यंदाच्या विश्वचषकाचे आयोजन हे भारतामध्ये केले जाणार आहे कारण भारत यावर्षी वर्ल्डकपचा यजमान आहे..

  • वर्ल्डकप 2023 मध्ये कोणते संघ खेळणार आहेत? (Which 10 teams are in World Cup 2023?)

यंदाचा विश्वचषक हा भारतात खेळवला जाणार आहे.  मुख्य पात्र संघ आणि विश्वचषक पात्रता सामन्यात जिंकेलेले संघ असे मिळून 10 संघ या एकदिवशीय विश्वचषकाचा भाग असणार आहेत. ज्यात प्रामुख्याने भारतीय संघ,पाकिस्तान,ऑस्ट्रोलिया, इंग्लंड,न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका,श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या 10 संघाचा समावेश आहे.


 

हेही वाचा:

“मला आता सवय झाली आहे..” वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे युजवेंद्र चहल नाराज, पहिल्यांदाच बोलत केला मोठा खुलासा..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here