DC vs PBKS: हर्षल पटेलची धुलाई करणारा ‘अभिषेक पोरेल’ आहे तरी कोण? शेवटच्या षटकात ठोकल्या 25 धावा,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0
26
 DC vs PBKS: हर्षल पटेल ची धुलाई करणारा 'अभिषेक पोरेल' आहे तरी कोण? शेवटच्या षटकात ठोकल्या 25 धावा,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
ad

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

 DC vs PBKS: आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) ने पंजाब किंग्सचा (PBKS) पराभव करत पहिला विजय मिळवला. नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम दिल्लीला फलंदाजीस पाचारण केले. दिल्लीने 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या. 14 महिन्यानंतर मैदानावर पुनरागमन करणारा ऋषभ पंथ मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो 18 धावांवर बाद झाला. या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल ज्याने शेवटच्या षटकात 25 धावा काढल्या.

एक वेळ अशी होती की, दिल्ली कॅपिटल्सचा संघ 7 बाद 137 धावांवर होता. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर तेरा चेंडू शिल्लक होते. त्यावेळेस बंगालचा युवा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला आणि त्याने तिसऱ्या चेंडूवर चौका मारून आपले इरादे स्पष्ट केले. पुढच्या षटकात सुमित कुमार हा बाद झाला. पण पोरेलच्या मनात काही वेगळेच होते.

 DC vs PBKS: हर्षल पटेल ची धुलाई करणारा 'अभिषेक पोरेल' आहे तरी कोण? शेवटच्या षटकात ठोकल्या 25 धावा,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

19 व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 8 बाद 149 होती. दिल्लीचा संघ 160 धावा पर्यंत पोहोचू शकत नाही असे वाटत होते. पण नेमके घडले उलटेच पंजाब किंग्स कडून शेवटचे षटक टाकण्यासाठी हर्षल पटेलच्या हाती चेंडू देण्यात आला. हर्षलने पहिलाच चेंडू शॉर्ट फेकला. त्यावर पोरेलने चौकार मारला. पुढच्या स्लोवर वन चेंडूवर त्याने मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या दोन्ही चेंडूवर पोरेलने चौकार मारले.

हर्षलच्या पाचव्या चेंडूवर पोरेलने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला आणि शेवटच्या शेंडूवर दोन रन धावा घेण्याच्या नादात तो कुलदीप कडून धावबाद झाला. याप्रमाणे पोरेलने सहा चेंडूत 25 धावा काढत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एक वेगळी छाप सोडली. त्याच्या छोट्याशा आणि आक्रमक खेळीच्या जोरावर दिल्लीने 174 धावा करू शकला.

एकंदरीतच अभिषेक ने 10 चेंडूत 32 धावा ठोकल्या. अभिषेकच्या तुफानी  बॅटिंग स्टाईल पुढे हर्षल पटेल फिका पडला. त्याच्या फलंदाजी मध्ये जबरदस्त कॉन्फिडन्स दिसून येत होता. त्याचे फलंदाजी पाहून युवराज सिंग ची आठवण झाली. येणार पुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून दिल्ली कॅपिटल्सला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

अभिषेक पोरेल हा बंगाल कडून रणजी क्रिकेट सामने खेळतो. मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत च्या जागेवर रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतले होते. आयपीएल 2023 मध्ये अभिषेक ने चार सामन्यात 33 धावा केल्या होत्या. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये 14 t20 सामने खेळले असून त्यात 140 च्या स्ट्राइकटने 294 धावा केल्या होत्या. तसेच फर्स्ट क्लास सामन्यात एक शतक आणि नऊ अर्धशतके ठोकले आहेत.

पहा व्हिडीओ,

 DC vs PBKS: ईशांत शर्मा झाला जखमी!

दिल्लीच्या या पहिल्या सामन्यात महत्त्वपूर्ण वेगवान गोलंदाज जखमी झाल्याने त्यांना मोठा झटका बसला आहे. महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लांपुर येथे झालेल्या सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याचा पाय मूडपल्याने दुखापत झाली आहे. त्यामुळे शर्माला सामना अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले.

दिल्ली कॅपिटल्स ला बसला मोठा झटका: वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी,संपूर्ण हंगामातून होउ शकतो बाहेर?

भारताच्या या वेगवान गोलंदाजाने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे सुरुवातीचे दोन विकेट घेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्यांदा कर्णधार शिखर धवन याला 22 धावांवर आउट केले तर फॉलो थ्रू मध्ये जॉनी बेयरस्टोला (9) धावबाद केले. हे दोन्ही विकेट त्याने एकाच षटकात घेऊन पंजाबला बॅकफूटवर ढकलले.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.