पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत लखनऊचा बँड वाजवणारा ‘जॅक फ्रेझर मॅकगर्क’ आहे तरी कोण?, सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ..!

0
2
पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत लखनऊचा बँड वाजवणारा 'जॅक फ्रेझर मॅकगर्क' आहे तरी कोण?, सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ..!

जॅक फ्रेझर मॅकगर्क: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 11 जणांच्या टीम मध्ये ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षे युवा खेळाडू जॅक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk ) याला संघात सामील केले होते त्यानेही संघ व्यवस्थापनेचा विश्वास सार्थ करत अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. जॅक याला वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याला दुखापत झाल्यानंतर रिप्लेसमेंट म्हणून दिल्लीने त्याला आपल्या स्कॉड मध्ये सामील करून घेतले. पदार्पणाच्या सामन्यातच आक्रमक खेळी करून त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघातील सर्वात स्वस्त खेळाडूंने पदार्पणाच्या सामन्यातच जिंकले हृदय, लखनऊचा वाजवला बँड; अखेरच्या क्षणी मिळाली होती संधी..

168 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरल्या दिल्लीच्या संघाने 63 धावांवर सलामीचे दोन्ही फलंदाज गमावले होते त्यानंतर फ्रेझर याने ऋषभ पंत सोबत राहून तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली फ्रेझर याने 35 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी केली ज्या दोन चौकार आणि पाच उत्तुंग षटकार ठोकले होते.

जॅक फ्रेझर मॅकगर्क ने ठोकले पदार्पणाच्या सामन्यात 5 षटकार..

आयपीएल मधील पदार्पणाच्या सामन्यात जॅकने पाच षटकार ठोकले आहेत. यासह तो आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंची यादीत चौथ्या स्थानावर पोचला आहे. यापूर्वी ब्रँडन मॅक्युलम याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात 13 षटकार ठोकले होते तर मायकल हसी याने नऊ षटकार ठोकले होते तर वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज कायल मेअर्स याने सात षटकार आयपीएलच्या पदार्पण सामन्यांमध्ये ठोकले होते. आयपीएलच्या पदार्पण सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करणारा जॅक अकरावा खेळाडू ठरला आहे.

जॅक फ्रेजर याच्या बाबतीत बोलायचे झाले तर ,तो ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघाचा सदस्य आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या 22 वर्षे खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया संघाकडून दोन वनडे सामने खेळले आहेत. यासह त्याने दुबई कॅपिटल्स मध्ये आयएल टी-20 लीग मध्ये देखील खेळला आहे.

लखनऊ सुपर जाएंट्स संघाकडून खेळताना सर्वोत्तम गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याच्या गोलंदाजीवर फ्रेजर याने सलग तीन षटकार ठोकून त्याची लाईन आणि लेन्थ अस्ताव्यस्त करून टाकली. दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादीत फ्रेजर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गौतम गंभीरने सोळा वर्षांपूर्वी 2008 साली दिल्लीकडून खेळताना नाबाद 58 धावांची खेळी केली होती. त्याचा हा विक्रम मोडीत करण्यासाठी जॅक याला चार धावा कमी पडल्या.

पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू..

116* – मायकेल हसी (CSK) विरुद्ध PBKS, मोहाली, 2008

55 – जेक फ्रेझर-मॅकगर्क (डीसी) वि एलएसजी, लखनौ, 2024

54 – विद्युत शिवरामकृष्णन (CSK) विरुद्ध डीसी, चेन्नई, 2008

54 – कुमार संगकारा (पीबीकेएस) विरुद्ध सीएसके, मोहाली, 2008

54 – आंग्रश रघुवंशी (KKR) विरुद्ध DC, विशाखापट्टणम, 2024

पदार्पणाच्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत लखनऊचा बँड वाजवणारा 'जॅक फ्रेझर मॅकगर्क' आहे तरी कोण?, सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ..!

फ्रेझर यास दिल्लीने 50 लाख रुपयांच्या बेस प्राईस मध्ये खरेदी करत आपल्या संघामध्ये सामील करून घेतले आहे. 12 एप्रिल रोजी त्याने लखनऊ विरुद्धच्या पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने आपल्या या शानदार खेळीने दाखवून दिले की, तो मोठ्या मंच वरील मोठा खेळाडू आहे. पदार्पणाच्या सामन्यात पदार्पणाच्या सामन्यात 55 धावांची अर्धशतकी खेळी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यासह त्याने ऋषभ पंत सोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचत दिल्लीचा विजयाचा मार्ग तयार केला.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here