Who is Jeffrey Vandersay : भारत आणि श्रीलंका (ind vs sl) यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 240 धावा केल्या. भारताचा डाव केवळ 208 धावांवर आटोपला. श्रीलंकेने भारताचा 32 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात श्रीलंकेच्या एका खेळाडूच्या प्रभावाखाली भारताचा डाव गडगडला. या खेळाडूने 7 षटकात 6 विकेट घेतल्या होत्या. नक्की कोण आहे तो खेळाडू आणि कशी आहे त्याची आजवरची क्रिकेट कारकीर्द जाणून घेऊया ..
Who is Jeffrey Vandersay : जेफ्री वँडरसे ठरला भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ…!
होय, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण जेफ्री वँडरसेने भारताच्या अर्ध्या खेळाडूंना केवळ 7 षटकात बाद केले आहे. आणि त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला 3 वर्षात प्रथमच भारतावर विजय मिळवून दिला. त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांच्या विकेट घेतल्या. दुखापतग्रस्त लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या जागी जेफ्री वँडरसेला दुसरा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी देण्यात आली आणि त्याने निवडकर्त्यांना अजिबात निराश केले नाही.
जेफ्री वँडरसे 2015 पासून क्रिकेट खेळतोय. ( Jeffrey Vandersay Cricket Carrer)
श्रीलंकेचा गोलंदाज जेफ्री वँडरसे 34 वर्षांचा असून तो गाम्पाहा जिल्ह्यातील वट्टाला या उपनगरातील आहे. तो केवळ 37 सामने खेळला आहे. टीम इंडियाविरुद्धचा हा त्याचा दुसरा सामना होता. वँडरसे टॉप स्पिन, गुगली आणि स्लाइडरसह विविध फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करतो. वँडरसे हा उजव्या हाताचा फलंदाजही आहे. त्याने 3 अर्धशतके झळकावताना जवळपास एक हजार धावा केल्या आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात झाली. पहिला सामना 30 जुलै 2015 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला, जो T20 सामना होता. या सामन्यात त्याने 4 षटकात 25 धावा दिल्या. 28 डिसेंबर 2015 रोजी, वँडरसेने क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
काल खेळला गेलेला सामना भारत विरुद्ध जेफ्री वँडरसेचा दुसरा सामना होता. याआधी भारताविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले. विराट कोहलीचा फटका थांबवताना तो चौकारासाठी त्याच्याच संघातील अन्य एका खेळाडूलाही भिडला. या धडकेमुळे तो गंभीर जखमी झाला. अन्य एक खेळाडूही जखमी झाला आहे. दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवर बाहेर काढावे लागले होते मात्र दुसऱ्या सामन्यात पुन्हा त्याने पुनरागमन करत मैदान गाजवले..