विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पहा काय सांगते आकडेवारी

0
3
विराट कोहली
विराट कोहली

क्रिकेटमध्ये संघाच्या कर्णधाराला महत्त्वाचे स्थान असते. कारण संघ हा त्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली घडतो. कोणत्याही संघाचा विजय झाला तर त्याचे सारे श्रेय हे कर्णधाराला जाते आणि पराभव झाला तर त्याचे खापर कर्णधाराच्या माथ्यावर फोडले जाते. जय-पराजयाच्या या फेरीतून मार्ग काढत काही खेळाडू यशस्वी कर्णधार ठरतात.

 

भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये कर्णधाराचे हे काटेरी मुकुट अनेक खेळाडूंनी परिधान करून संघाला यशाची वाट दाखवून दिली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये विश्वचषक स्पर्धेत एकूण आठ खेळाडूंनी संघाचे नेतृत्व केले आहे. या आठ कर्णधारांपैकी कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विजय संघाला मिळवून दिले आहे याची माहिती पाहूयात.

महेंद्रसिंग धोनी याने भारतीय संघाचे नेतृत्व करत असताना अनेक ऐतिहासिक विजय संघाला मिळवून दिले आहेत. 2011 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विश्वचषक जिंकून देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले होते. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंके विरुद्ध मिळालेला विजय विक्रमी ठरला. 2011 आणि 2015 मध्ये त्याने विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या कारकिर्दीमध्ये विश्वचषक स्पर्धेतील 17 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात त्याला 14 सामन्यात यश मिळाले तर दोन सामन्यात त्याचा पराभव झाला.

चॅम्पियन खेळाडू कपिल देव यांनी विश्वचषक स्पर्धेत 15 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांना 11 सामन्यात यश मिळाले तर चार सामन्यात पराभव देखील पहावे लागले. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा लॉर्डसच्या मैदानावर विश्वचषक पटकावला.

विराट कोहली
विराट कोहली

 

स्टायलिश फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन यांनी सर्वाधिक 23 सामन्यात भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व केले. त्यात केवळ त्यांना दहा सामन्यात विजय मिळवता आला तर बारा सामन्यात पराभव करावा लागला.

सौरव गांगुली यांनी 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात 11 सामन्यापैकी 9 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला तर दोन सामन्यात पराभव झाला. हे दोन्हीही पराभव ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाले आहेत

विराट कोहलीने 2019 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. विश्वचषक स्पर्धेतल्या नऊ सामन्यात नेतृत्व करत असताना त्याला केवळ सात सामन्यात यश मिळाले तर दोन सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

2003 मध्ये सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यात नेतृत्व केले तर चारही सामन्यात भारतीय संघ विजयी ठरला.

 

राहुल द्रविड ने 2007 साली भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. वेस्टइंडीजमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय संघ बाद फेरीतुनच बाहेर पडला. संघाला तीन पैकी एकाच सामन्यात यश मिळाले तर दोन सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी भारताचा पराभव केला होता.

श्री व्यंकटराघवन यांची विश्वचषक स्पर्धेत कामगिरी फारच निराशाजनक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here