ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
नितीश रेड्डी : आयपीएलने जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांना अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. या लीगमध्ये भारताला रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पांड्यासारखे सुपरस्टार मिळाले तर ऑस्ट्रेलिया समवेत इतर देशांनाही याचा दमदार फायदा झाला आहे. आयपीएल ऑक्शन मध्ये प्रचंड प्रमाणात पैसा आणि त्यातून दमदार कामगिरी केली तर रातोरात स्टार होण्याची संधी मिळते.
आतापर्यंत एखादा अनकॅप्ड विदेशी खेळाडू आयपीएल मध्ये चमकला तर त्या देशाकडून राष्ट्रीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. डार्सी शॉर्ट व मैथ्यू शॉर्ट हे खेळाडू देखील आयपीएलची देन आहेत. यंदाच्या हंगामामध्ये विदेशी खेळाडूंपेक्षा काही अनकॅप्ड भारतीय खेळाडू जबरदस्त चमकले आहेत.
यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स चा वेगवान गोलंदाज मयंक यादव, कोलकत्ता नाईट रायडर्स युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी आणि पंजाब किंग्स संघाचा शशांक सिंह याच्यामध्ये सामील आहे. मंगळवारी वीस वर्षाचा आणखीन एक भारतीय क्रिकेटपटूने दमदार कामगिरी करत अचानक प्रकाश झोतात आला. या खेळाडूचे नाव आहे नितेश रेड्डी.
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणारा हा खेळाडू मूळचा आंध्र प्रदेशचा असून पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. त्याबद्दल त्याला प्लेयर ऑफ द मॅच चा किताब देण्यात आला. विशेष म्हणजे आयपीएल मधला हा त्याचा चौथा सामना होता.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा संघाची स्थिती 39 धावांवर तीन बाद अशी होते त्यानंतर नितीश रेड्डी येणे सामन्याची सर्व सूत्रे हाती घेत जबरदस्त कामगिरी केली त्याने इतर खेळाडून बरोबर छोट्या छोट्या भागीदारी केल्या राहुल त्रिपाठी सोबत 25 तर हेन्ड्री काल सेने याच्याबरोबर 36 धावांची भागीदारी रचली त्यानंतर अब्दुल समद याच्यासोबत 50 धावांची भागीदारी केली नितीश ने 37 चेंडूत चार चौकार आणि पाच षट्काराच्या मदतीने 64 धावांची तडाखेबाज खेळी केली या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 172.97 असा होता.
त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात नऊ बाद 182 धावा केल्या प्रतिउत्तरात पंजाबचा संघ सहभाग 180 धावा करू शकला. अष्टपैलू खेळाडू असलेल्या नीतीशने फलंदाजी सोबत गोलंदाजी देखील आपली धडाकेबाज कामगिरी केले त्याने तीन षटकात 33 धावा देत एक गडी बाद केले, ज्यात जितेश शर्माची महत्त्वपूर्ण विकेट होती.
नीतीशा चा जन्म आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला होता. त्याचे संपूर्ण नाव नितीश कुमार रेड्डी असे आहे. आयपीएल 2023 च्या ऑप्शन मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला वीस लाख रुपयाच्या बेस प्राईज मध्ये खरेदी केले होते. मागील हंगामामध्ये त्याला दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या हंगामामध्ये त्याला सुरुवातीच्या दोन सामने खेळण्यास मिळाले होते. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याने आठ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 14 धावा केल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती.
नितीशने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 17 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. तसेच त्यात त्याने 566 धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 52 विकेटची नोंद आहे.
नितीशचा क्रिकेटर होण्याचा हा प्रवास सोपा राहिला नाही. पंजाब विरुद्ध त्याने मॅच विनिंग खेळी केल्यानंतर आंध्र प्रदेशचा माजी कर्णधार आणि भारताकडून कसोटी क्रिकेट खेळलेल्या हनुमान विहारीने ट्विट करून त्याचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, नितीश एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी नोकरीवर पाणी सोडले होते. त्यांनीच त्याला मार्गदर्शन आणि त्याचे पालन पोषण केले आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आज हे यश मिळाले आहे मी नितीशला तेव्हापासून पाहतो जेव्हा तो सतरा वर्षांचा होता. मला त्याचा प्रचंड अभिमान आहे ज्याप्रमाणे त्यांनी स्वतःला घडवले आहे. भविष्यात तो सनरायझर्स आणि भारतासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो. नितीश ने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्याचे वडील त्याच्यासाठी पहिली व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावरती विश्वास टाकला एक चांगला क्रिकेटपटू बनवण्यासाठी.
नितीशने आयपीएल मधील आपल्या पहिल्या कमाईतून आपल्या कुटुंबासाठी एक कार देखील खरेदी केली होती. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. नितीश हा विराट कोहली याला आदर्श मानतो. मागील वर्षे झालेल्या आयपीएलमध्ये त्याने पदार्पण केले होते, तेव्हा नितेशने विराट कोहली याला गोलंदाजी देखील केले होती. यानंतर नितीशने विराट कोहली सोबत एक फोटो काढून तो इंस्टाग्राम वर शेअर केला. विराटने त्याला त्याच्या बॅटवर ऑटोग्राफ देखील दिला होता.
नितीशने लिस्ट ए चे 22 सामने खेळले असून त्यात 36.63 च्या सरासरीने 403 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत देखील त्याने 14 विकेट घेतले आहेत. त्याने आतापर्यंत नऊ t20 सामने खेळले असून 120.56 च्या सरासरीने 170 धावा केल्या आहेत. नितेशने 2021 मध्ये लिस्ट ए च्या सामन्यात विदर्भ विरुद्ध खेळताना अर्धशतक ठोकले होते. हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक यांना तो आदर्श मानतो. बीसीसीआयने 2017-18 विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये शानदार अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल 16 वर्षाखालील जगमोहन दालमिया अवॉर्डने त्याला सन्मानित केले होते.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.