यंदाच्या आयपीएल मध्ये खेळणारे हे आहेत सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू.. पदार्पणाच्या आधीच युवा खेळाडू आला चर्चेत..!

यंदाच्या आयपीएल मध्ये खेळणारे हे आहेत सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू.. पदार्पणाच्या आधीच युवा खेळाडू आला चर्चेत..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहास मध्ये यंदाच्या हंगामातल्या आयपीएलची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झालेली आहे. कारण  यंदाच्या आयपीएल मध्ये जितके अनुभवी खेळाडू खेळतात तितकेच, नवख्या खेळाडूंना देखील यात खेळण्याची संधी मिळाली आहे. क्रिकेट हा असाच खेळ आहे जिथे अनुभवास सोबत युवा जोशची देखील गरज असते. चला तर मग जाणून घेऊयात यंदाच्या आयपीएल मध्ये सर्वात वयस्कर खेळाडू आणि युवा खेळाडू कोण आहे?

Cricket 10 1

महेंद्रसिंग धोनी आहे आयपीएल 2024 मधील सर्वांत वयस्कर खेळाडू..

यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आयपीएल चषकासाठी विरोधी संघाबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यात सर्वात वयस्कर खेळाडूंचा विचार केला तर सीएसके चा कर्णधारमहेंद्रसिंग धोनी हा आहे. धोनी हा यंदाच्या हंगामातला सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याचे वय 42 वर्ष आहे. तो 2008 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले आहे.

त्याने 250 सामन्यांमध्ये 24 अर्ध शतकांच्या सहाय्याने 5082 धावा केल्या आहेत. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी या लीग मधला सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच त्याच्या नावावर 180 बळी घेतल्याची नोंद आहे.

केकेआरचा अंगकृष रघुवंशी ठरणार सर्वांत लहान आयपीएल खेळाडू..

यंदाच्या मोसमा मध्ये सर्वाधिक युवा खेळाडूंना नशीब आजमावण्याची संधी मिळाली आहे. यंदाच्या मोसमातला सर्वात युवा खेळाडूचा विचार केला तर तो, कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा अंगकृष रघुवंशी हा आहे. मिनी ऑक्शन मध्ये केकेआरने दिल्लीच्या संघाकडून या युवा खेळाडूंना अवघ्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले. रघुवंशीचे वय अवघे 18 वर्षे आहे. तो यंदाच्या आयपीएल मधला सर्वात युवा खेळाडू आहे.

यंदाच्या आयपीएल मध्ये खेळणारे हे आहेत सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू.. पदार्पणाच्या आधीच युवा खेळाडू आला चर्चेत..!

19 वर्षाखालील भारतीय संघामध्ये तो सलामवीरची भूमिका बजावतो. 2022 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तो चर्चेत आला होता. त्याची फलंदाजी पाहून प्रत्येक जण रोहित शर्माशी त्याची तुलना केली जात आहे. त्याची बॅटिंग करण्याची स्टाईल देखील हिटमॅन सारखी आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर याला तो आपला गुरु मानतो. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने दिल्ली सोडून मुंबईमध्ये क्रिकेट प्रशिक्षणासाठी अभिषेक नायर कडे आला होता. अभिषेक नायर यांच्या घरी राहून त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. अभिषेक नायर त्याला त्याच्या मुला समान मानतो.

अंगकृष 2022 दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तेव्हापासून तो भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेत आला. त्याने सहा सामन्यात 46.33 च्या सरासरीने 278 धावा केल्या ज्यात एका दमदार शतकाचा तर एका अर्ध शतकाचा समावेश होता.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *