गुजरातच्या फलंदाजांना घाम फोडणारा ‘यश ठाकूर’ आहे तरी कोण? व्हायचे होते महेंद्रसिंग धोनी सारखा यष्टीरक्षक..!

0
3
गुजरातच्या फलंदाजांना घाम फोडणारा 'यश ठाकूर' आहे तरी कोण? व्हायचे होते महेंद्रसिंग धोनी सारखा यष्टीरक्षक..!

यश ठाकूर: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. 164 धावांचे विजयी लक्ष्य गुजरात समोर ठेवल्यानंतर गोलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. एक षटक गोलंदाजी केल्यानंतर मयंक यादव दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर विजयाची संपूर्ण जबाबदारी युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने आपल्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे निभावली. 

मयंक यादवचे मैदाना बाहेर जाणं हे लखनऊच्या संघासाठी फार मोठे नुकसानकारक होते. कारण मागील दोन सामन्यांमध्ये तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊन गौरवण्यात आले. लखनऊचा कर्णधार के एल राहुल (Kl Rahul) याने युवा गोलंदाज यश ठाकूर याच्यावर विश्वास दाखवत पावर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी संधी दिली. त्यानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत लखनऊच्या गोलंदाजावर तुटून पडलेल्या गुजरातच्या फलंदाजांना एकापाठोपाठ बाद करत धक्के दिले. सुरवातीला गुजरातची धावसंख्या बिनबाद 47 अशी होती.

IPL 2024: [WATCH] Yash Thakur's Outstanding Bowling Helps LSG Bounce Back  Against GT - Cricfit

यशने आपल्या स्पेलची सुरुवात दमदार केली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर तो गुजरातच्या फलंदाजांवर तुटून पडला आणि 3.5 षटकात 30 धावा ते पाच महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तो आयपीएल 2024 मध्ये पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. ठाकूरच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा आयपीएल मध्ये गुजरात टायटनचा पराभव केला आहे. यापूर्वी गुजरातने लखनविरुद्धचे चारही सामने जिंकले होते.

यशने गुजरातच्या डावातील पंधराव्या षटकामध्ये विजय शंकर याला बाद करत दुसरी विकेट घेतली. याच षटकात त्याने राशीद खान याला शून्यावर बाद केले. हे षटक निर्धाव ठरले. त्यात त्याने एक ही धाव न देता गुजरातचे दोन गडी बाद केले आणि त्यांचे विजयाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले.

यश ठाकूर घरेलू क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो.

यश ठाकूर (Yash Thakur) हा विदर्भ संघाकडून रणजी क्रिकेट खेळतोय. तो डेथ ओवरचा स्पेशलिस्ट गोलंदाज मानला जातो. त्याने सय्यद अली मुस्ताक अली t20 स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच अनेक फ्रेंचाइजीनीं त्याला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर तो लखनऊच्या संघात दाखल झाला. आयपीएल ऑक्शन 2023 मध्ये त्याची बेस प्राईज ही वीस लाख रुपये होती, पण तो 45 लाखात विकला गेला.

गुजरातच्या फलंदाजांना घाम फोडणारा 'यश ठाकूर' आहे तरी कोण? व्हायचे होते महेंद्रसिंग धोनी सारखा यष्टीरक्षक..!

यश हा विदर्भ एक्सप्रेस उमेश यादव याला आदर्श मानतो. उमेशच्या गोलंदाजी पासून प्रभावित होत त्याने आतापर्यंतचा प्रवास केला आहे. एक वेळ अशी होती की त्याने महेंद्रसिंग धोनीला फॉलो करत होता. महेंद्रसिंग धोनी प्रमाणे त्यालाही एक यशस्वी विकेटकीपर व्हायचे होते. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो विकेटकीपर म्हणून संघात खेळत होता. त्यानंतर विदर्भाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणकर यांनी त्याला नेट्स मध्ये गोलंदाजी करताना पाहिले आणि त्यानंतर त्याला विकेट कीपिंग सोडून वेगवान गोलंदाज होण्याचा सल्ला दिला होता. (who is yash thakur player of gujrat titans)


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here