भारतात सध्या आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पाच t20 सामन्यांची मालिका खेळयाची आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा करार संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियमक बोर्डाने (BCCI ) पुन्हा एकदा नव्या प्रशिक्षकाच्या शोधात राहणार आहे.
51 वर्षीय राहुल द्रविड यांनी मागील दोन वर्षापासून भारतीय संघासोबत काम पाहत आहे. प्रशिक्षक पदावर कायम राहण्यासाठी त्याला पूर्ण एकदा बीसीसीआय कडे अर्ज करावा लागणार आहे. मात्र राहुल या पदासाठी किती उत्सुक आहे याबाबत अद्याप कोणतेही माहिती मिळाली नाही. राहुल द्रविड हे प्रशिक्षक पदासाठी अर्ज केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरले तर राहुल द्रविड प्रशिक्षक पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. जर विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात भारतीय संघ अपयशी ठरला तर राहुल द्रविड वर गच्छंती होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय नव्या कोचिंग स्टाफच्या शोधात आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे ही धुरा सोपवण्याची शक्यता आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण ने यापूर्वी प्रभारी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या गैरहजरीत काम पाहिले होते. आयर्लंड, वेस्टइंडीज दौऱ्यात तसेच एशियन गेममध्ये त्याने राहुलच्या अनुपस्थितीत लक्ष्मण ने चांगले काम केले.
व्हीव्हीएस लक्ष्मण कडे भारताचा पुढचा कोच म्हणून पाहिले जात आहे. लक्ष्मणने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये अनेक ऐतिहासिक खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. कोलकत्याच्या मैदानावर त्याने खेळलेली द्विशतकी खेळी आजही क्रिकेट प्रेमींच्या मनात घर करून आहे. राहुल द्रविड जर प्रशिक्षक म्हणून कायम राहिला तरी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती मिळू शकते. कारण भारताने अनेक सामने सलग खेळले आहेत.
राहुल द्रविडची क्रिकेट कारकीर्द ही अत्यंत उत्तम दर्जाची राहिली आहे. पण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असताना कधीही त्याला विश्व विजेत्या संघाचा सदस्य होता आला नाही. यंदा मात्र त्याला चालू संधी चालून आली आहे. ती म्हणजे भारतीय प्रशिक्षकाच्या रूपाने. खेळाडू म्हणून असताना त्याला विश्वचषक कधी जिंकता आला नाही, मात्र प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये तो भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देऊ शकतो. यापूर्वी 2011 मध्ये भारतीय संघाने गॅरी कस्टर्न या विदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषक जिंकला होता.