पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून सुवर्णपदक हिसकावून घेणार का? नीरज चोप्राला रौप्यपदकाऐवजी सुवर्णपदक मिळणार का? जाणून घ्या या दाव्यांचे सत्य काय आहे.आता आपण जाणून घेऊया या गोष्टींमध्ये काय खर आणि काय खर आहे ते, या गोष्टीची सत्यता पडताळून पाहुयात.
नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळेल का?
वास्तविक पाहता आपण बघितले तर, डोप चाचणी घेण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. अनेकदा पदक जिंकल्यानंतर खेळाडूंची लगेच डोप चाचणी केली जाते. भालाफेक स्पर्धा संपली नंतर केवळ पाकिस्तानच्या अर्शद नदीमचीच नव्हे तर भारताच्या नीरज चोप्रा आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सचीही डोप चाचणी घेण्यात आली. ते मैदानात असतानाच त्यांचा तपास अहवालही आला.
पदक विजेत्या खेळाडूंची डोप चाचणी ही नवीन गोष्ट नाही. हे केवळ ॲथलीटने कोणतीही फसवणूक केली नाही याची खात्री करण्यासाठी केले जाते. अशा परिस्थितीत अर्शद नदीम अंमली पदार्थ सेवन किंवा अन्य कोणत्याही आरोपात दोषी आढळल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
हे ही वाचा:- सर्वाधिक पगार असलेले टॉप 5 क्रिकेट प्रशिक्षक, रवी शास्त्री आणि मिसबाह उल हक यांचाही या यादीत समावेश आहे.
कारण ही डोप चाचणी केवळ प्रोटोकॉल पाळण्यासाठी घेण्यात आली होती आणि तो कोणत्याही संशयास्पद स्थितीत सापडला म्हणून नाही.जी डोप चाचणी केवळ एक औपचारिकता म्हणूनच घेण्यात आली होती है आपण लक्षात आणले पाहिजे.
डोप चाचणी म्हणजे काय?
जगातील जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धांमध्ये डोप चाचणी घेतली जाते. ही चाचणी सामान्यतः मूत्र आणि रक्ताद्वारे केली जाते. कोणत्याही खेळाडूने कोणतेही औषध, ताकद वाढवणारी टॅब्लेट किंवा वैद्यकीय शब्दानुसार फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे का हे जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे.
हे ही वाचा:- हे आहेत भारतीय क्रिकेट संघातील टॉप पॉप्युलर क्रिकेटर, ज्यांचे फॅन्स जगभरात आहेत.