Cricket Newsआयपीएल 2024क्रीडा

हे आहेत आयपीएल मध्ये खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू, वयस्कर खेळाडूंनीच केली आयपीएल मध्ये दमदार कामगिरी!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएलच्या 16 हंगामामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी दाखवली आहे. काही खेळाडूंनी तर, आपल्यातील कौशल्याचे प्रदर्शन करत निवृत्तीनंतरही आपल्यामध्ये क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवून दिले. दिवंगत खेळाडू शेन वॉर्न हे आपल्या पुढील उदाहरण आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही शेन वॉर्न यांनी लहान सहान खेळाडूंना सोबत घेऊन आयपीएल 2008 चा पहिला चषक जिंकला होता.

ऍडम गिलख्रिस्ट ने देखील शेन वॉर्न यांच्यासारखे काम केले होते. 2009 मध्ये डेक्कन चार्जर संघाला किताब जिंकून दिला होता. आयपीएल मध्ये खेळाडू वयाची 40 ची पार केल्यानंतर ही खेळत असल्याचे दिसून येते. आज आपण आयपीएल मधील सर्वात वयस्कर खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत.

हे आहेत आयपीएलमध्ये खेळणारे सर्वांत वयस्कर खेळाडू.

ब्रॅड हॉग : 45 वर्ष 92 दिवस

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने आयपीएल 2012-13मध्ये राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2015 -2016 मध्ये केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी तो आयपीएल मधला सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता.

हे आहेत आयपीएल मध्ये खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू, वयस्कर खेळाडूंनीच केली आयपीएल मध्ये दमदार कामगिरी!

केकेआर कडून त्याला पाच सामन्यात सहभागी होत आले. त्याने त्याचा आयपीएल मधला शेवटचा सामना गुजरात लायन्स विरुद्ध 45 वर्ष आणि 92 दिवसांचा असताना खेळला होता. हॉगने 21 आयपीएल सामन्यात 23 विकेट घेतले होते.

प्रवीण तांबे : 44 वर्ष 219 दिवस

आयपीएल मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबे याला कोणीच विसरू शकत नाही. त्याच्या कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट देखील रिलीज झाला होता. आयपीएल 2023 मध्ये त्याने राजस्थान रॉयल संघाकडून खेळताना पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने धडाकेबाज कामगिरी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

क्रिकेट खेळण्याचा कोणताही अनुभव नसला तरी त्याला आयपीएल मध्ये खेळण्याची संधी मिळाली होते. आयपीएलच्या तीन हंगामात त्याने 33 सामन्यात 28 बळी घेतले होते. त्याने त्याचा शेवटचा 2020 मध्ये सामना 44 वर्ष 219 दिवसाचा असताना खेळाला होता. त्यावेळी तो केकेआर संघाचे प्रतिनिधित्व करत होता.

हे आहेत आयपीएल मध्ये खेळणारे सर्वात वयस्कर खेळाडू, वयस्कर खेळाडूंनीच केली आयपीएल मध्ये दमदार कामगिरी!

आयपीएल मध्ये खेळणारा तो सर्वात दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. टी टेन क्रिकेटमध्ये त्याने खेळल्यामुळे त्याला बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळण्यास प्रतिबंध केला होता. 

मुथया मुरलीधरन- 42 वर्ष 35 दिवस

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथया मुरलीधरन यांनी 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून आयपीएल मधील सुरुवात केली होती. सी एस के कडून ते सलग तीन वर्ष खेळले. 2010 मध्ये सीएसकेला चषक जिंकून देण्यामध्ये त्याचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यानंतर 2012 आणि 2014 मध्ये ते आरसीबीच्या संघात खेळले.

800 ट्रेलर: मुथैया मुरलीधरन की बायोपिक महान स्पिनर पर प्रकाश डालती है |  मनोरंजन समाचार - बिजनेस स्टैंडर्ड

त्यापूर्वी एक वर्ष ते कोच्चि टस्कर्स केरल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल 2014 मध्ये मुरलीधरन ने वयाच्या 42 वर्ष 35 दिवसांचा असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

इमरान ताहिर- 42 वर्ष 29 दिवस

दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर हा जस जसे वय वाढेल तसतसे तो अधिकच घातक होत गेला. 2014 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पदार्पण करत दमदार कामगिरी केली. 2018 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत होता.

त्याच वर्षी चेन्नईने आयपीएलचा चषक जिंकला होता. 2021 मध्ये त्याने त्याचा आरसीबी विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यावेळी त्याचे वय 42 वर्षे 29 दिवसांचे होते. आयपीएल मध्ये त्याने 59 सामन्यात 82 विकेट घेतले होते.

क्रिस गेल- 42 वर्ष 7 दिवस

युनिव्हर्सल बॉस या नावाने प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल हा t20 मधला सर्वात मोठा खेळाडू ठरला. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये सुरुवात केली होती. 2011 ते 2017 पर्यंत तो आरसीबी च्या संघाकडून खेळत होता.

आयपीएल 2021 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने त्याचा शेवटचा सामना खेळला, त्यावेळी त्याचे वय 42 वर्ष आठ दिवसांचे होते.

MS Dhoni Ipl Career: धोनी आयपीएलमध्ये चमकत आहे, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

महेंद्र सिंह धोनी- 42 वर्ष 260 दिवस

महेंद्रसिंग धोनी आयपीएल मध्ये खेळणारा भारताचा सर्वाधिक वयस्कर खेळाडू ठरला. त्याचे सध्याचे वय 42 वर्ष 260 दिवसांचे आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएल 2023 चा किताब जिंकला होता. त्यावेळी त्याचे वय 41 वर्ष 326 दिवसांचे होते. आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा तो सर्वात वयस्कर कर्णधार ही ठरला. त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल चषक जिंकला होता.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button