Viral video: …आणि बाबर आजम पुढे स्टीव्ह स्मिथने चक्क हातच जोडले, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

बाबर आजम: अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  एकीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) कसोटी मालिका सुरु असतांना दुसरीकडे पाकिस्तान आणि ऑस्ट्रोलिया यांच्यात सुद्धा 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. काल खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात पराभवाचा सामना करावा लागला. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत यजमानांनी पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला.

PAK vs AUS: आणि स्टीव्ह स्मिथने बाबर आजम पुढे चक्क हातच जोडले,व्हिडीओ व्हायरल..

पुन्हा एकदा पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम मोठी खेळी खेळू शकला नाही. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने 41 धावा केल्या. या खेळीदरम्यान असे काही घडले की, स्टीव्ह स्मिथने बाबर आझमसमोर हात जोडले.. सोशल मिडीयावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हे का आणि केव्हा घडले? जाणून घेऊया सविस्तर.

Viral video: आप बाबर आझम पुढे स्टीव्ह स्मिथने चक्क हातच जोडले, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात 35 धावा केल्यानंतर बाबर आझम खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने असे कृत्य केले की, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला उत्तर द्यावे लागले. काही क्षण स्मिथला काहीच समजले नाही. त्याला काहीच उत्तर सुचेना तेव्हा त्याने हात जोडले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

PAK vs AUS: स्मिथने बाबरासमोर हात जोडले

कमिन्स बॉलिंगसाठी रनअपवर होता आणि बाबर गार्ड घेत होता. तेव्हा विकेटच्या मागे उभा असलेला स्मिथ बाबरला काहीतरी म्हणाला. स्मिथने बाबरला काय सांगितले ते माहीत नाही. पण, बाबरने ताबडतोब स्मिथच्या दिशेने आपली बॅट हलवली, जणू तो स्मिथला म्हणत होता की, तू मला सांग मी कोणत्या स्टंपचा गार्ड घेऊ? बाबरकडून अशी प्रतिक्रिया स्मिथलाही अपेक्षित नव्हती. त्यामुळे बाबरने त्याच्याकडे बॅट लांबवताच त्याने लगेच हात जोडले.

पहा व्हायरल व्हिडीओ..

PAK vs AUS:बाबर 41 धावा करून बाद झाला

बाबरने बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 79 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 4 चौकार मारले. मात्र, स्मिथसोबत झालेल्या या बाचाबाचीनंतर बाबरला केवळ 6 धावांची भर घालता आली. मेलबर्न कसोटी गमावल्याने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानची 0-2 अशी घसरण झाली. आता उभय संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी येथे होणार आहे.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *