CSK vs RR LIVE: म्हणून मागच्या सामन्याचा हिरो ‘ट्रेंड बोल्ट’ चेन्नई विरुद्ध खेळत नाहीये, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने स्वतःचं केला खुलासा…
CSK vs RR LIVE: म्हणून मागच्या सामन्याचा हिरो ट्रेंड बोल्ट चेन्नई विरुद्ध खेळत नाहीये, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने स्वतःचं केला खुलासा…
आयपीएल 2023 च्या 17 व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे संघ आमनेसामने आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS DHONI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर राजस्थानचा (RR) संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
बंगलोर विरुद्ध लखनऊ जायन्ट्स चा होणार सामना, तर आज या खेळाडूंना भेटणार मोका तर हे खेळाडू बसणार बाहेर
नाणेफेक झाल्यानंतर जेव्हा दोन्ही कर्णधारांनी आपल्या संघाची यादी जाहीर केली तेव्हा राजस्थान रॉयल्स (RR) च्या यादीत ट्रेंड बोल्टचे (Trent Bolt) नाव नसल्यामुळे चाहते चांगलेच चकित झाले. मागच्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणारा ट्रेंड बोल्ट या सामन्यात का खेळत नाही, असा प्रश्न लोकांना पडला. ज्यावर स्वत कर्णधार संजूने (Sanju Samson) खुलासा केला.
गुजरात टायटन्स चा यश दयाल ला ५ सिक्स मारल्याने त्याच्या आईने सोडले अन्न, वडिलांनी केला मोठा खुलासा
नाणेफेक गमावल्यानंतर संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला, ‘आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडली असती’. या हंगामात आम्ही चांगली सुरुवात केली आहे, परंतु आम्हाला विजयाची ही गती कायम ठेवण्याची गरज आहे. आम्ही चेपॉकमध्ये खूप दिवसांनी खेळत आहोत. तसे करण्याचा अनुभव आणि तरुण आमच्याकडे आहेत. चेपॉकमध्ये येणे आणि येथे खेळणे नेहमीच आनंददायी असते.
राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्ट या सामन्यात खेळत नाहीये. संजू सॅमसनने (Sanju Samson) सांगितले की, तो किरकोळ दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. या मोसमात खेळलेल्या शेवटच्या तीन सामन्यांत त्याने 5 बळी घेतले आहेत. त्याचे न खेळणे चाहत्यांसाठी आणि संघासाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. तो पहिल्याच षटकात विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.
राजस्थान रॉयल्समध्ये (RR) आज ट्रेंट बोल्ट नसल्यामुळे वेगवान गोलंदाज कुलदीप सेनची ( Kuldeep Sen) एंट्री झाली आहे, तर रियान परागला (Riyan Parag) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कुलदीप सेन मध्य प्रदेशातून आहे. गेल्या मोसमात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याच्याकडे वेगवान गोलंदाजीसोबत नवीन चेंडूवर विकेट घेण्याची क्षमता आहे.
असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू- Plyaing 11 of Chennai super kings & Rajasthan Royals
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग
हेही वाचा|: