viral video: एकाच षटकात 3 विकेट घेऊन या गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेचे केले हाल, टाकला एवढा जबरदस्त चेंडू की, फलंदाजासह कर्णधारसुद्धा झाला हैराण ,व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल..
viral video: एकाच षटकात 3 विकेट घेऊन या गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेचे केले हाल, टाकला एवढा जबरदस्त चेंडू की फलंदाजासह कर्णधारसुद्धा झाला हैराण ,व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल..
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने मालिकेवर कब्जा केला. तिसऱ्या आणि निर्णायक सामना जिंकून वेस्ट इंडिजनेमालिका जिंकली. टी-२० मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात संघाचा गोलंदाज अल्झारी जोसेफने 5 विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या हातातून सामना हिरावून घेतला.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात संघ अडचणीत असताना तो धारदार गोलंदाजी करायला आला आणि त्याने एकामागून एक सर्व शानदार फलंदाजांच्या विकेट घेतल्या.

त्याने या सामन्यात एकूण 5 बळी घेतले आणि शेवटचा बळी वेन पार्नेल बनवले. वेन पार्नेलला त्याने एवढा जबरदस्त चेंडू टाकला की, तो पाहतच राहिला आणि त्याच्या दंडया उडाल्या. जोसेफच्या गोलंदाजीतील हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खरेतर, 2 बळी घेतल्यानंतर, अल्झारी जोसेफ पुन्हा एकदा 19 व्या षटकात शेवटचे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने एकाच षटकात तीन विकेट घेत सामन्याचा रंगच बदलला. त्याने प्रथम रिझा हेन्रिक्स आणि हेन्री क्लासेन यांना बाद केले, तर नंतर पाचव्या चेंडूवर त्याने अचानक लेन्थ बदलून यॉर्कर टाकला जो थेट स्टंपमध्ये गेला आणि वेन पार्नेललाही बाद केले.
पहा व्हायरल व्हीडीओ..
https://twitter.com/cricket_kida1/status/1640896194493960192?s=20
असा राहिला सामन्याचा स्कोअर..
फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 220 धावा केल्या. यामध्ये 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमॅरियो शेफर्डने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 6 बाद 213 धावाच करू शकला. संघासाठी रीझा हेंड्रिक्सने 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली.