Viral Video: आयपीएलआधी आंद्रे रसेल भयंकर मूडमध्ये..ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजंची तुफानी धुलाई करत चोपल्या एवढ्या धावा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

Viral Video: आयपीएलआधी आंद्रे रसेल भयंकर मूडमध्ये..ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजंची तुफानी धुलाई करत चोपल्या एवढ्या धावा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

 आंद्रे रसेल: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 सामना (Aus vs Wi) पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज आंद्रे रसेलच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात रसेलने वेस्ट इंडिजसाठी २४४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

रसेलच्या बळावर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 221 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजांची केली तुफानी धुलाई, आंद्रे रसेलचा धमाका..

या सामन्यात आंद्रे रसेल ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. रसेल येताच त्याने षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली. रसेलने अवघ्या 29 चेंडूत 71 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट २४५ च्या आसपास होता.

रसेलने आपल्या खेळीत 7 षटकार आणि 4 चौकार मारले. आयपीएलपूर्वी, मेगा टी20 लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी रसेलचा असा फॉर्म फायदेशीर ठरेल.

Viral Video: आयपीएलआधी आंद्रे रसेल भयंकर मूडमध्ये..ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजंची तुफानी धुलाई करत चोपल्या एवढ्या धावा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

याआधी आंद्रे रसेलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 16 चेंडूत 37 धावांची खेळी केली होती. तर, तो पहिल्या T20 मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला फक्त 2 चेंडूत 1 धाव करता आली.

त्याला ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ॲडम झाम्पाने बाद केले. रसेलने आतापर्यंत 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 21 च्या सरासरीने 955 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा जास्त राहिला आहे. तर, सर्वोच्च स्कोअर 71 आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *