‘आयपीएलपुढे पीएसएलची काहीच औकात नाही..” पाकिस्तानच्या या खेळाडूने पीसीबीची काढली इज्जत, बोलला असं काही की सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

 आयपीएल: भारतात आयपीएलची सुरुवात 2008 साली झाली आहे. तेव्हापासून, 16 हंगाम खेळले गेले आहेत. आयपीएलचा 17वा हंगाम 2024 मध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल ही क्रिकेटची सर्वात मोठी लीग बनली आहे. या लीगमध्ये जगभरातील क्रिकेटपटू सहभागी होतात.

इंडियन प्रीमियर लीगप्रमाणेच पाकिस्तानमध्येही अशीच लीग खेळली जाते, ज्याचे नाव पाकिस्तान सुपर लीग( PSL)  आहे. याची सुरुवात 2016 मध्ये झाली होती. पण दोन्ही लीगमध्ये  फार मोठे अंतर असतांना देखील पाकिस्तान नेहमीच या लीगची तुलना भारतातील आयपीएल बरोबर करते.  मात्र आता पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूनेच पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले आहे.

क्रिकेटपटू वसीम अक्रमने रैपिड-फायर मध्ये आयपीएल आणि पीएसएल बद्दल केले मोठे वक्तव्य..

'आयपीएलपुढे पीएसएलची काहीच औकात नाही.." पाकिस्तानच्या या खेळाडूने पीसीबीची काढली इज्जत, बोलला असं काही की सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
Wasim Akram – Yuvakatta

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम अलीकडेच एका रैपिड-फायर मुलाखतीत सहभागी झाला होता, जिथे त्याला आयपीएल आणि पीएसएल यापैकी एक निवडण्यास सांगितले होते. त्याने दोन लीगमधील फरक स्पष्ट केला. त्यांनी आयपीएलला खूप मोठे आणि पीएसएलला पाकिस्तानची मिनी आयपीएल असे वर्णन केले.

वसीम अक्रम म्हणाले,

“मी दोन्हीमध्ये काम केले आहे; तुम्ही दोन स्पर्धांची तुलना करू शकत नाही. आयपीएल खूप मोठे आहे आणि पाकिस्तानसाठी पीएसएलही खूप मोठे आहे, यात काही शंका नाही, हे पाकिस्तानच्या मिनी आयपीएलसारखे आहे. मात्र दोन्ही स्पर्धामध्ये कुठेही रेस किंवा तुलना होत नाही.

 

आयपीएल आणि पीएसएलमध्ये जमीन आसमानचा फरक.!

'आयपीएलपुढे पीएसएलची काहीच औकात नाही.." पाकिस्तानच्या या खेळाडूने पीसीबीची काढली इज्जत, बोलला असं काही की सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

आयपीएल आणि पीएसएल हे संघ निवडण्यासाठी दोन वेगवेगळ्या फॉरमॅटवर आधारित आहेत. पीएसएलमध्ये मसुदा प्रणाली आहे तर आयपीएल लिलाव प्रणालीवर कार्य करते. दोन्ही लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूंवर एक नजर टाकली तर. पीएसएलमध्ये प्लॅटिनम श्रेणीतील खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. या गटात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी यांचा समावेश असून त्यांना जवळपास 1.30 कोटी रुपये मिळतात. यंदाच्या आयपीएल 2024 च्या लिलावाबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यावरून दोन्ही लीगमधील फरक दिसून येतो.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *