पत्नीचे अवैद्य संबंध होते त्यामुळे या क्रिकेटर ने 7 गोळ्या झाडून केली बायकोची हत्या, जगातील एकमेव क्रिकेटर ज्याला फाशी देण्यात आली.

वेस्ट इंडिज संघातील माजी खेळाडू लेस्ली हिल्टन याला वेस्ट इंडिज संघातील ऑल राऊंडर खेळाडू मानले जात. कारण तो गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे करत असायचा परंतु तुम्हाला माहिती आहे का स्वताच्या बायकोचा खून केल्यामुळे त्याला वयाच्या 50 व्यां वर्षी फाशी ची शिक्षा दिली होती.
1905 साली जमैकामध्ये जन्मलेल्या लेस्लीला त्याचे वडील कोण होते हे त्याला माहीतच न्हवते शिवाय लगेच 3 वर्षाच्या काळात त्याच्या आईचे सुद्धा दुखत निधन झाले. आईच्या निधनानंतर त्याचे आयुष्य खूप संघर्षमय होते. सुरुवातीच्या काळात रोजगार करून आणि ट्रेलर चे काम करून पैसे कमवायचे.
तसेच त्या वेळी तो एका लोकल क्लब मध्ये खेळण्यासाठी जायचा. फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली असल्यामुळे त्याला 1935 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी मिळाली. लेस्लीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 6 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने एकूण 70 धावा करत 16 विकेट घेतल्या.
लेस्ली हिल्टन एका जमैकन पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता यानंतर 1942 साली त्याने त्या मुलीबरोबर लग्न केल. सुरुवातीच्या काळात सर्व सुरळीत चालले होते परंतु 1954 साली त्याची बायको काही कामानिमित्त न्यूयॉर्कला गेली असता त्याला एक पत्र आले. यामध्ये लेस्लीला समजले की त्याच्या बायकोचे बाहेर अवैध संबंध आहेत.
असे दिवसेंदिवस त्याला वेगवेगळ्या चिठ्ठ्या मिळू लागल्या त्यामुळे रागाच्या भरात त्याने बायको ला 7 गोळ्या घालून मारून टाकले त्यामुळे वयाच्या 50 व्या वर्षी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.