WTC 2025 Final: भारत पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार? बस..जिंकावे लागतील इतके सामने!

WTC 2025 Final: भारत पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार? बस..जिंकावे लागतील इतके सामने!

 WTC 2025 Final: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात झालेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेमध्ये भारताने 4-1अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. तसेच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत देखील पहिल्या स्थानावर कायम राहिला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेमध्ये कांगारूनी विजय मिळवला असला तरी त्याचा फारसा फरक भारतावर झाला नाही.

भारताच्या या मालिकेतील विजयामुळे पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC FINAL 2025) अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताचे चान्सेस वाढले आहेत. भारताने यापुढे अर्ध्या सामन्यात जरी विजय मिळवला तरी त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीचे तिकीट निश्चित होऊन जाईल.

IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा 'सिक्सर किंग'! विराट-गावस्कर-युवराजला टाकले पाठीमागे!

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कसा पोहचू शकतो याचे आपण गणित आता पाहूयात. जून महिन्यात T20 विश्वचषक संपल्यानंतर भारताला बांगलादेश विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेचे वेळापत्रक अजून घोषित केलेले नाही. ही मालिका भारतात होणार असल्याने भारताचे पारडे या मालिकेत जड असणार आहे. बांगलादेश सारखी कमजोर टीम भारतासारख्या बलाढ्य संघाला कसोटीत मात देईल असे वाटत नाही. कारण भारत मायदेशात इतर संघाच्या तुलनेत दस पटीने चांगला खेळतो. त्यामुळे या मालिकेत ही भारत विजयी होईल, असे म्हणायला काही हरकत नाही.

बांगलादेश विरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही मालिका भारतात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हा संघ भारतात कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे विषय आहे. न्यूझीलंडच्या संघ हा भारताला नेहमीच टफ राहिला आहे.

पण मायदेशात न्यूझीलंडचा संघ भारताला आव्हान देईल असे वाटत नाही. या तीन कसोटी सामन्यात विजय मिळवला तर भारताचे अंतिम सामन्यातील तिकीट जवळपास पक्के होणार आहे. याचबरोबर इतर संघाच्या कामगिरी वरती देखील नजर ठेवावी लागणार आहे.

IND vs ENG: धरमशाळा कसोटी संपताच 'या' 3 भारतीय खेळाडूंचे करिअर कायमचे संपणार, पुन्हा भारतीय संघात दिसणार नाहीच..

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. भारताची या दौऱ्यावर खरी परीक्षा असणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताला एका सामन्यात विजय मिळविणे गरजेचे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी मालिकेमध्ये रोमांचकारी सामने पाहायला मिळाले. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वी भारताला पाच मायदेशात तर पाच विदेशात कसोटी सामने खेळायचे आहे. भारताने दहा पैकी पाच सामन्यात जरी विजय मिळवला तरी त्यांचे अंतिम सामन्यातील तिकीट पक्के होणार आहे.

भारताने आतापर्यंत नऊ कसोटी सामन्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला आहे तर एक सामना अनिर्णित राखला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला तर 3 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. न्यूझीलंड सहापैकी तीन सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभूत झाला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *