IPL 2024: आरसीबीचा वनवास संपणार; सपोर्ट स्टाफ मध्ये एका चॅम्पियन खेळाडूला दिली एन्ट्री, यंदा ई साला कप नाम दे पक्का..!

IPL 2024:आरसीबीचा वनवास संपणार; सपोर्ट स्टाफ मध्ये एका चॅम्पियन खेळाडूला दिली एन्ट्री, यंदा ई साला कप नाम दे पक्का..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात फेवरेट टीम कोणती आहे असे जर चाहत्यांना विचारले तर, आपसूकपणेच ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)चे नाव घेतील. गेल्या 16 वर्षाच्या इतिहासामध्ये या संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघांमध्ये खेळले आहेत. 2008 पासून ही टीम चाहत्यांची फेवरेट टीम आहे. या संघाचे फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहेत. पण आतापर्यंत या संघाला एकदाही टी20 चा किताब जिंकता आला नाही.

IPL 2024:आरसीबीचा वनवास संपणार; सपोर्ट स्टाफ मध्ये एका चॅम्पियन खेळाडूला दिली एन्ट्री, यंदा ई साला कप नाम दे पक्का..!

या संघामध्ये रन मशीन विराट कोहली शिवाय द वॉल राहुल द्रविड, जम्बो अनिल कुंबळे, केविन पीटरसन धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल, 360 या नावाने ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्स,फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल सारखा धडाकेबाज फलंदाज खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये आपला बोलबाला तयार केलेल्या या खेळाडूंनी आपल्या कीर्तीचा डंका साता समुद्रपार पोहोचवला आहे. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू असूनही आरसीबीला मात्र एकदाही आयपीएलचा चषक उंचावता आला नाही. विराट कोहली गेल्या कित्येक वर्षापासून संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत होता, पण तरी देखील त्याला यश आले नाही. आता फाफ डूप्लेसी ही कामगिरी करू पाहतोय.

आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात 16 वर्षांमध्ये भलेही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने किताब जिंकला नाही, जागतिक कीर्तीचे फलंदाज असून देखील आपल्या फॅन्सला आनंद देऊ शकले नाहीत, भलेही ते आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपू शकले नाहीत, पण तरी सुद्धा संघाच्या चाहत्या वर्गामध्ये थोडीही कमतरता आलेली नाहीये. यावर्षी आयपीएल 2024 साठी आरसीबीचा संघ थोडा आणखी शक्तिशाली दिसत आहे ,कारण या संघांमध्ये एका चॅम्पियन खेळाडूची एन्ट्री झाली आहे. जो खेळाडू या संघाला चॅम्पियन बनवूनच दम घेणार आहे. आरसीबी ला आत्तापर्यंत जे मिळवता आले नाही ते यश मिळवून देण्याची गॅरंटी या खेळाडूंने दिली आहे.

IPL 2024: अँडी फ्लावरला मिळाले आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक पद.

हा खेळाडू मैदानात उतरून गोलंदाजी आणि फलंदाजी करून सामना जिंकून देणार नाही तर आपल्या संघातील खेळाडूंना विजयाचा कानमंत्र देणार आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून या संघाचा मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लावर असणार आहेत. आरसीबीने नुकतेच झिमबॉम्बेचे माजी फलंदाज अँडी फ्लावर यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जे की या संघाचे नशीब बदलण्याचे काम करणार आहेत. फ्लावर यांनी आतापर्यंत आपल्या प्रशिक्षक पदाच्या कालावधीमध्ये चार संघांना चॅम्पियन बनवले आहे.

IPL 2024:आरसीबीचा वनवास संपणार; सपोर्ट स्टाफ मध्ये एका चॅम्पियन खेळाडूला दिली एन्ट्री, यंदा ई साला कप नाम दे पक्का..!

आरसीबीने अँडी फ्लॉवर यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त केले आहे, जे की एक सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानले जातात. मागील वर्षी आयपीएल मध्ये ते लखनऊ सुपर जॉईंट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र यंदाच्या वर्षात त्यांना लखनऊ संघाने या पदावरून दूर केले. त्यानंतर आरसीबीने तात्काळ आपल्या सपोर्ट स्टाफ मध्ये त्यांना सामील करून घेतले.

अँडी फ्लॉवरबद्दल सांगायचे तर, त्यांच्या आतापर्यंतच्या प्रशिक्षक पदाच्या कालावधीत, त्यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान्सला विजेतेपद मिळवून दिले आहे, तर दुबई येथे झालेल्या ILT लीगमध्ये गल्फ जायंट्सला ट्रॉफी मिळवून दिली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सेंट लुसियाने वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये अंतिम फेरी गाठली होती. अबूधाबी टी10 लीगमध्ये दिल्ली बुल्सला चॅम्पियन बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्सला चॅम्पियन बनविले. इंग्लंड क्रिकेट संघासोबत ते बरेच वर्ष प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहेत.

झिम्बाब्वेच्या या माजी दिग्गज खेळाडूंनी आतापर्यंत चार विविध संघांना ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आरसीबीच्या टीम मॅनेजमेंटला आणि चाहत्यांना त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे अँडी फ्लावर यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव असलेल्या या खेळाडूने आरसीबीला आयपीएलचा चषक जिंकून देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांना त्यात किती यश येते हे पाहण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *