World Cup 2023: विश्वचषक 2023 नंतर रोहित शर्मा होणार निवृत्त, या 3खेळाडू पैकी एकजण होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कर्णधार..

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वात बेईमान खेळाडू, ज्यांनी मैदानात उघडपणे खोट्याचे खरे केले मात्र केमेऱ्यानेने समोर आणले खरे रूप..

 

World Cup 2023: या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जात आहे. ही स्पर्धा जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. टीम इंडिया या वेळी विश्वचषक जिंकण्याचा पहिला दावेदार समजला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्वच्या सर्व सामने जिंकून आपली विजयी रथ कायम ठेवला आहे.

या स्पर्धेनंतर कदाचित भारतीय क्रिकेट संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नवा कर्णधार मिळेल. पांढऱ्या चेंडूशिवाय लाल चेंडूतही नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुढचा कर्णधार कोण यावर आतापासूनच चर्चेचा बाजार तापला आहे. दरम्यान, भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक  सुनील गावसकर यांनी भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतील अशा तीन युवा खेळाडूंची नावे सांगितले आहेत. त्यांच्या मते या युवा खेळाडूंकडे टीम इंडियाची कमान दिल्यास संघ नक्कीच प्रगतशील कामगिरी करेल..

शुभमन गिल

सुनील गावस्कर यांच्या मते विश्वचषक 2023 नंतर या 3 खेळाडूंमध्ये आहे कर्णधार होण्याची चमक..

1. शुभमन गिल (Shubhman Gill)

भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला आणि सतत नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारा भारताचा भावी कर्णधार म्हणून पहिल्या क्रमांकावर असलेला युवा फलंदाज शुभमन गिलची निवड केली आहे.  सुनील गावस्कर यांनी भारताचा पुढील कर्णधार म्हणून शुभमन गिलचे नाव घेतले आहे. गावसकर यांच्या मते, शुभमन गिलने कदाचित कधीच कर्णधारपद भूषवले नसेल, पण त्याच्याकडे अंडर-19 संघाचे कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि तो ही जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावू शकतो. त्यामुळे रोहित शर्मानंतर कर्णधार होण्याच्या शर्यतीत सर्वांत पहिले शुभमनचे नाव येते असेही ते म्हणाले.

2. अक्षर पटेल (Akshar Patel)

गावसकर यांनी या यादीत अक्षर पटेलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे, जो चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत चमकदार कामगिरी करत आहे आणि सर्वांनाच आपला चाहता बनवत आहे.

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वात बेईमान खेळाडू, ज्यांनी मैदानात उघडपणे खोट्याचे खरे केले मात्र केमेऱ्यानेने समोर आणले खरे रूप..

गावसकर यांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे की, ‘टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उपकर्णधारपद केले आहे, तो बर्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे आणि तो संघाचे नेतृत्व करू शकतो. गावस्कर म्हणाले की, माझ्या दृष्टीने हे दोन खेळाडू भावी कर्णधार आहेत.

3. इशान किशन (Ishan Kishan)

माजी क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनला या यादीत तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे. मात्र, त्यासाठी किशनला प्लेइंग-11 मध्ये आपला दावा पक्का करावा लागेल, असे त्याने सांगितले. गावस्कर यांनी यशस्वी जैस्वालला वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे संघात स्थान न दिल्याने प्रश्नही उपस्थित केला. त्याने आयपीएलमध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली त्याचप्रमाणे त्याला मर्यादित फॉरमॅटच्या खेळात स्थान मिळायला हवे, असे गावस्कर म्हणाले


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *