“लडके अच्छे खेल रहे है…” रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का? यावर रोहितने स्पष्टच सांगितलं.

"लडके अच्छे खेल रहे है..." रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का? यावर रोहितने स्पष्टच सांगितलं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या कॉन्फरन्समध्ये रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचबद्दल चर्चा केली. यासोबतच तो 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता.

याबद्दल रोहित शर्मा म्हणाला,

IND vs SA: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचू शकतो इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्यात एवढ्या धावा....

“माझ्यासमोर जे आहे ते खेळण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला काय म्हणायचे मला ठाऊक आहे. तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल.”

रोहित शर्माच्या या उत्तरावरून तो 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

T20 विश्वचषक खेळण्याबाबत हिटमॅनने स्पष्ट उत्तर दिले नसले तरी तो म्हणाला की, प्रत्येकाला खेळायचे आहे आणि सर्व मुलांना चांगली कामगिरी करायची आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी तो उत्साहित असल्याचे दिसते. एवढी मेहनत करत असलो तर काहीतरी मोठं मिळायला हवं, असंही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने केएल राहुलच्या विकेटकीपिंगबाबतही एक वक्तव्य केले. तो म्हणाला, “राहुलने विश्वचषकात ज्या प्रकारे विकेट्स राखल्या आहेत, ते पाहता त्याने त्याच्या यष्टिरक्षणावर काम केले आहे. त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्यामुळे आम्हाला मधल्या फळीत एक मजबूत फलंदाज मिळाला आहे.”

"लडके अच्छे खेल रहे है..." रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का? यावर रोहितने स्पष्टच सांगितलं.

तो पुढे म्हणाला,

“राहुल वनडेमध्ये मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत आहे. परिस्थितीनुसार फलंदाजी कशी करायची हे त्याला माहीत आहे. तो किती काळ विकेट्स राखेल हे मला माहीत नाही, पण तो चांगली कामगिरी करत आहे. याशिवाय पहिल्या कसोटीसाठी संघ संयोजनाबाबत बोलताना रोहित म्हणाला की, आम्ही आमच्या ७५ टक्के संघाची निवड केली आहे. उर्वरित संघाचा निर्णय आम्ही संघाच्या बैठकीत घेऊ.

 

हेही वाचा:

IND vs SA 1st Test: ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे नक्की काय? आजच्या कसोटीला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ का म्हटलं जातंय? वाचा सविस्तर..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *