भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या रणनीतीबाबत खुलासा केला आहे.
भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर हा पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला होता. त्यामुळे त्याला पहिला कसोटी सामना आणि न्यूझीलंडविरुध्द झालेल्या मालिकेत देखील खेळता आले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये सराव करत होता. आता फिट होऊन तो भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे की, जर तो कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असेल तरच त्याला संघात संधी दिली जाईल.

राहुल द्रविड यांनी म्हटले की, “मला आनंद आहे की, श्रेयस अय्यर फीट होऊन परतला आहे. मात्र आम्ही काही दिवस त्याचा सराव पाहिल्यानंतर निर्णय घेऊ. त्याने आज खेळपट्टीवर भरपूर वेळ घालवला. आजची ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही उद्या देखील त्याची फिटनेस पाहणार आहोत. जर तो पाच दिवसांचा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज असेल तर, त्याला संघात संधी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा..
पाकिस्तानने १९९२ चा WC केव्हा जिंकला होता? अभिनेत्रीने दिलेले उत्तर पाहून हसून हसून व्हाल लोटपोट..