Featureआयपीएल 2024

आयपीएल मध्ये फ्री-हीट चेंडूवर या फलंदाजांनी मारलेत सर्वाधिक षटकार,पहा यादी..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल मध्ये एखाद्या गोलंदाजाने चेंडू नो बॉल टाकला की, त्याच्या पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद होत नाहीत. त्याला खेळण्यासाठी तो चेंडू फ्री ठरवला जातो. म्हणजेच जरी तो बाद असला तरी त्याला बाद देता येणार नाही. म्हणून नोबॉल टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवर फलंदाज आक्रमक होऊन बिनधाकपणे फटके मारतात. आयपीएल मध्ये अशा फ्री हिट चेंडूवर किती फलंदाजांनी आतापर्यंत षटकार मारलेत याची माहिती घेऊयात.

फ्री-हीट चेंडूवर सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू..

1.ब्रॅडन मॅक्युलम

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडन मॅक्युलम याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये चार वेळा फ्री हिट वर षटकार ठोकला होता. त्याच्याच नावे आयपीएल मधील पहिले शतक ठोकण्याचा विक्रम आहे. आज ते इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत .

2. के एल राहुल

लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुल याने आयपीएल मध्ये चार वेळा फ्री हिटच्या चेंडूवर षटकार ठोकले होते. नुकताच तो दुखापतीतून सावरला असून यंदाच्या आयपीएलमध्ये देखील तो धमाका करण्यास सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच त्याची आयपीएल मधली कामगिरी देखील धमाकेदार आहे.

आयपीएल मध्ये फ्री-हीट चेंडूवर या फलंदाजांनी मारलेत सर्वाधिक षटकार,पहा यादी..!

3.ए बी डिव्हिलियर्स

ए बी डिव्हिलियर्स याने फ्री-हीटच्या तीन चेंडूवर षटकार ठोकले आहेत. आयपीएल मध्ये त्याने धावांचा पाऊस पडला होता. त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

4. सौरव गांगुली

बेंगॉल टायगर सौरव गांगुली यांनी तीन फ्री हेच चेंडूवर षटकार ठोकले आहेत. 2008 आणि 2009 च्या आयपीएल मध्ये ही कामगिरी केली होती. दादा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने केकेआर आणि पुणे संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

5.एडम गिलख्रिस्ट

एडम गिलख्रिस्ट याने तीन वेळा फ्री हेड चेंडूवर षटकार ठोकल्याची नोंद आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जागतिक क्रिकेट मधील सर्व गोलंदाजांवर एक धाक निर्माण केला होता.

आयपीएल मध्ये फ्री-हीट चेंडूवर या फलंदाजांनी मारलेत सर्वाधिक षटकार,पहा यादी..!

6.रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा याने देखील तीन फ्री हिट चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकले होते. तो सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतोय. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूंनी सीएसके ला अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळवून दिले आहेत.

७.ख्रिस गेल

धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने देखील त्याच्या आईपीएल कारकिर्दीमध्ये तीन फ्री हिट षटकार खेचले आहेत. गेलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.


==आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button