कोट्यावधी रुपयावर पाणी सोडत या खेळाडूने IPL मधून घेतली माघार; आता गाजवतोय काऊंटी क्रिकेट, ठोकले धडाकेबाज शतक…

कोट्यावधी रुपयावर पाणी सोडत या खेळाडूने IPL मधून घेतली माघार; आता गाजवतोय काऊंटी क्रिकेट, ठोकले धडाकेबाज शतक...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL :  दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएल 2024 चा हंगाम फारच निराशाजनक राहिला आहे. या संघाने आतापर्यंत पाचपैकी एकाच सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. इतर चार सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी इतर संघाच्या तुलनेत अत्यंत कमजोर दिसत आहे.

कोट्यावधी रुपयावर पाणी सोडत या खेळाडूने IPL मधून घेतली माघार; आता गाजवतोय काऊंटी क्रिकेट, ठोकले धडाकेबाज शतक...

या संघाच्या सलामवीरांनी आतापर्यंत एकही दमदार सुरुवात करून दिली नाही. पण पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर याने दोन सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली तसेच मधल्या फळीतील फलंदाज ट्रिस्टन स्टब्स हा धडाकेबाज खेळी करण्यामध्ये यशस्वी ठरला. मात्र इतर कोणत्याही फलंदाजाने म्हणावी तशी कामगिरी केली नाही. या संघाकडे अनुभवी फलंदाजाची कमतरता साफ पणे जाणवत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने मिनी ऑक्शन मध्ये हॅरी ब्रूक याला चार कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. हॅरी हा मधल्या फळीतील एक धडाकेबाज फलंदाज आहे. मात्र आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याने अचानकपणे या लीगमधून आपले नाव माघारी घेतले होते. वैयक्तिक कारणामुळे त्याने आयपीएल मधून माघार घेतल्याचे सांगितले.

IPL मधून बाहेर पडून काऊंटी चॅम्पियनशिप खेळतोय हॅरी ब्रुक..!

आयपीएल मध्ये खेळण्यास नकार देणारा हॅरी ब्रुक मात्र काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये क्रिकेट खेळताना दिसून येतोय. काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये हॅरी ब्रूक याने यॉर्कशायर संघाकडून खेळताना धडाकेबाज शतकी खेळी केले आहे. ज्या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाने हॅरी याला पर्यायी खेळाडूची निवड केली, त्याच दिवशी त्याने शतक ठोकण्याचा कारनामा केला होता.

 हॅरी ब्रुकने अवघ्या 69 चेंडूत 100 धावांची शतकी खेळ केली. यात त्याने 14 चौकार आणि दोन षटकार देखील ठोकले. त्याच्या खेळीमुळे यॉर्कशायरला पहिल्या डावात 6 गडी गमावून 246 धावा करण्यात यश आले. त्याच्याशिवाय यॉर्कशायरचा सलामीवीर ॲडम लेथनेही शतक झळकावले. नंतर पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

कोट्यावधी रुपयावर पाणी सोडत या खेळाडूने IPL मधून घेतली माघार; आता गाजवतोय काऊंटी क्रिकेट, ठोकले धडाकेबाज शतक...

हॅरी ब्रूक याने आयपीएलमध्ये न खेळण्याचे कारण काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. ब्रूकच्या आजीचे निधन झाल्याने आयपीएल मधून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की,

माझ्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे होते. त्यामुळे मी आयपीएलमधून माघारी घेतली आहे. ती माझ्यासाठी एका पर्वतासमान होती. माझं बालपण तिच्याच घरी गेल आहे. माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये तिचे फार मोठे योगदान आहे. जीवनाविषयीचा माझा दृष्टिकोन आणि क्रिकेट वरील माझे प्रेम या दोन्ही गोष्टींना तिने आकार दिला होता.

ब्रुक आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. मागील वर्षी त्याने केकेआर संघाविरुद्ध दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आले नाही. त्याची बॅट शांतच राहिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आयपीएल ऑक्शनच्या वेळेस रिलीज करून टाकले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी करून आपल्या संघात दाखल करून घेतले.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…