भारताला विश्वचषक जिंकून देणारे हे 3 खेळाडू होऊ शकतात नव्या कोचिंग स्टाफ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील …!

भारताला विश्वचषक जिंकून देणारे हे 3 खेळाडू होऊ शकतात नव्या कोचिंग स्टाफ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील ...!

जून 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कोचिंग स्टाफ यांचा बीसीसीआय सोबतचा करार संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आतापर्यंत असूनच नव्या कोचिंग स्टाफसाठी शोधा शोध सुरू केली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआय पुढील कोचिंग स्टाफ मध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश करण्याची शक्यता मानली जात आहे. हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकून देणारे खेळाडू आहेत. ते तीन खेळाडू कोण असू शकतील यावर एक नजर टाकूया.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एका माजी भारतीय वेगवान गोलंदाजाची नियुक्ती होऊ शकते. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आशिष नेहरा यांचे नाव सर्वात अधिक चर्चेत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा यांची नियुक्ती होऊ शकते. 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात या गोलंदाजाचा सर्वात मोठा हात होता. दोन वनडे विश्वचषकाचे अंतिम सामन्यात खेळणाऱ्या या खेळाडूंने भारताच्या ऐतिहासिक विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. 2003 विश्वचषक मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये सहा गडी बाद करून भारताला एक महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. 2022 मध्ये गुजरात टायटन्स या संघाला आयपीएलचा चषक जिंकून देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण रोल होता. त्यानी आपल्या कारकीर्दीत 120 वनडे सामन्यात 157 बळी घेतले आहेत तर 17 कसोटी सामन्यात 44 बळी मिळवण्यात त्यांना यश आले.

Virender Sehwag: A mini-Tendulkar, mini-Viv Richards, mini-Bradman retired from international cricket

 

भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक ठोकणारा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा सेहवाग हा भारताचा पुढचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पाहिला जाऊ शकतो. सेहवाग यापूर्वीच भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला असता. मात्र बीसीसीआयने त्याच्या अटी पूर्ण केल्या नसल्याने तो प्रशिक्षक पदापासून दूर झाला. वीरेंद्र सेहवागने भारतातर्फे 111 कसोटी सामन्यात 8586 धावा काढल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 251 सामन्यात 8273 धावा केल्याची नोंद आहे. वीरेंद्र सेहवागला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती दिल्यास तो विक्रम राठोड यांचे जागा घेऊ शकतो. आयपीएल मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सल्लागार म्हणून काम पाहिला आहे.

जहीर खान हा विश्वचषक 2011 मध्ये भारतातर्फे सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. भारताच्या नव्या कोचिंग स्टाफ मध्ये त्याच्या देखील नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट असलेल्या या गोलंदाजाकडे भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाऊ शकते.

डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या 45 वर्षीय जहीरने भारतातर्फे 92 कसोटी सामन्यात 311 गडी बाद केल्याची नोंद आहे. तसेच 200 सामन्यात 282 बळी घेतले आहेत. त्याला प्रशिक्षण देण्याचा पुरेसा अनुभव आहे. मुंबई इंडियन संघाच्या कोचिंग स्टाफ मध्ये देखील तो काम पहातोय. पारस म्हाब्रे हे सध्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.

भारताला विश्वचषक जिंकून देणारे हे 3 खेळाडू होऊ शकतात नव्या कोचिंग स्टाफ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील ...!

 


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *