महिला क्रिकेट विश्वात खळबळ… या महिला क्रिकेटरचं झाल निधन..गुरुदिझटियाच्या जंगलामध्ये झाडाला लटकलेला मिळाला मृत्यूदेह, धक्कादायक कारण आले समोर..

महिला क्रिकेट विश्वात खळबळ… या महिला क्रिकेटरचं झाल निधन..गुरुदिझटियाच्या जंगलामध्ये झाडाला लटकलेला मिळाला मृत्यूदेह, धक्कादायक कारण आले समोर..
भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या बातमीने प्रत्येक क्रिकेट चाहत्याला धक्का बसला आहे. ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री स्वेन हिचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मात्र, या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
पण, ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाचे प्रशिक्षक आणि राजश्री यांच्यात मतभेद झाल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. याशिवाय इतरही अनेक मोठे धक्कादायक खुलासे झाले आहेत.
राजश्री स्वेन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला
शुक्रवारी ओडिशाची महिला क्रिकेटर राजश्री स्वेन हिचा मृतदेह गुरुडिझहटिया जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली आणला. प्राथमिक तपासानुसार हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, 22 वर्षीय राजश्री एके दिवशी अचानक घरातून गायब झाली.
त्यानंतर कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पुरी येथील रहिवासी असलेल्या राजश्रीची स्कूटर आणि हेल्मेट पोलिसांना यापूर्वी मिळाले होते. यादरम्यान त्यांचा फोन बंद येत होता. परंतु, अधूनमधून नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रेस केले आणि मृतदेहापर्यंत पोहोचले. गेल्या ३ दिवसांपासून ती बेपत्ता होती.
राजश्री स्वैन यांच्या आईने दिले मोठे वक्तव्य.
ओडिशा टीव्हीच्या बातम्यांनुसार, राजश्री क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या 25 सदस्यीय संघाचा एक भाग होती, परंतु अंतिम संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे ती तणावाखाली होती आणि त्यानंतर तिला कोणीही पाहिले नाही. दरम्यान, राजश्रीच्या आईने एका टीव्ही चॅनलला निवेदन दिले की,
“त्यांची मुलगी निवड कॅपसाठी कटक येथे आली होती आणि एका हॉटेलमध्ये थांबली होती. 10 दिवसांच्या शिबिरानंतर, त्यांची मुलगी सर्वोत्तम खेळाडू असतानाही तिला जाणूनबुजून अंतिम संघातून वगळण्यात आले. तेव्हापासून त्यांची मुलगी तणावात होती आणि तिने बहिणीला फोनही केला होता.
राजश्री स्वेनच्या आईचा असा विश्वास आहे की तिच्या 22 वर्षांच्या मुलीची अंतिम निवड झाली नाही त्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये होती. मात्र ती आत्महत्या करू शकत नाही असाही त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे नक्की हा घातपाताचे प्रकरण असल्याचा संशय घरच्यांना येतोय. पोलिसांनी त्याअनुसार चोकशी करण्यास सुरवात केली आहे.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: