Women T20 WorldCop 2024: महिला टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीची मोठी घोषणा,भारताला मिळू शकते गुड न्यूज..!

0
5
Women T20 WorldCop 2024: महिला टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीची मोठी घोषणा,भारताला मिळू शकते गुड न्यूज..!

Women T20 WorldCop 2024:  येत्या काही दिवसातच महिला क्रिकेटमध्ये  आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०24 (Women T20 WorldCop 2024) रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद आधी बांगलादेशकडे सोपवण्यात आले होते मात्र आता  बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता आयसीसी तेथे 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद  हिरावून घेण्याच्या तयारीत आहे. ICC कडून याबाबत एक मोठे अपडेट देखील समोर आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बांगलादेशकडून या संपूर्ण स्पर्धेचे यजमानपद हिसकावून ते दुसऱ्या देशाकडे सोपवू शकते. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी ICC ची पहिली पसंती भारताला आहे, तर श्रीलंका आणि UAE सुद्धा या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या विचाराधीन आहे.

Women'S T20 World Cup: Women's T20 World Cup: India hope to crack English  code | Cricket News - Times of India

 

Women T20 WorldCop 2024: आयीसीसी बदलणार स्पर्धेचे ठिकाण..

आयसीसीने बांगलादेशच्या पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. या स्पर्धेची पूर्ण तयारी भारत आणि श्रीलंकेत कमी वेळात करता येईल. तथापि, ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेत पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तर, पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात व्हिसा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत युएईलाही पर्याय म्हणून ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने मान्य केल्यास पाकिस्तानी संघाला कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत ही स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल.

Women T20 WorldCop 2024: महिला टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीची मोठी घोषणा,भारताला मिळू शकते गुड न्यूज..!

या मुद्द्यावर आपण  बारीक लक्ष ठेवून असल्याचा दावा आयीसीसीकडून  अहवालात करण्यात आला आहे. बोर्डाच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आयसीसीकडे सर्व सदस्य देशांमध्ये सुरक्षा निरीक्षण प्रणाली आहे. टूर्नामेंट सुरू होण्यासाठी अजून 7 आठवडे बाकी असताना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा बांगलादेश नाही तर कोणत्या देशात आयोजित केली जाईल हे सांगणे घाईचे ठरेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here