आपल्या देशात सर्वात आवडीने खेळला जाणारा खेळ हा क्रिकेट आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात तसेच खेळतात सुद्धा. आपल्या देशात अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात परंतु क्रिकेट खेळाचे वेड हे सर्वात जास्त आहे.

देशात अनेक वेगवेगळे क्रिकेट चे सामने होतात. त्यामध्ये T20, वर्ल्ड कप, रंझी ट्रॉफी आणि सर्वात लोकप्रिय म्हणजेच आयपीएल. आपल्या देशात दरवर्षी T20 आयपीएल चे नियोजन करण्यात येते. या मध्ये देशातील वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या संघात आपल्याला खेळताना दिसतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात मुंबई इंडियन्स खरंच चॅम्पियन बनण्यासाठी तयार आहे का, कोणाचा समावेश संघात आहे आणि काय त्रुटी आहेत या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
यंदा च्या वर्षी आयपीएल प्रमाणेच वुमेंस प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे. महिला प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती ४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार असून, त्यासाठी सर्व संघ सज्ज आहेत. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनेही आपला संघ विकत घेतला आहे. पण मुंबई इंडियन्सचा महिला संघ आयपीएल जिंकण्याची दावेदार आहे की नाही? या विषासंदर्भात आपण तुम्हाला माहिती देणार आहोत.
मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक स्टार महिला क्रिकेटपटूंचा सुद्धा समावेश आहे आणि महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम जिंकण्याची ताकदही या संघात आहे. परंतु या संघात काही त्रुटी सुद्धा आहेत. कोणताच संघ हा परिपक्व नसतो हे आपणास माहितच आहे.
मुंबई इंडियन्स ने या नीलावात अनेक ऑल राऊंडर महिला खेळाडूंना विकत घेतले आहे. तसेच काही दिग्गज फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा यांचा समावेश संघात केला आहे त्यामुळे चॅम्पियन होण्यापासून मुंबई इंडियन्स ला कोणीच रोखू शकत नाही.
मुंबई इंडियन महिला संघात हरमनप्रीत कौर, नाट सीव्हर, एमिलिया कार, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमारा काझी, प्रियांका बाला, सोनम या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.