Women’s T20 World Cup 2024: आज या देशाशी भिडणार भारतीय महिला संघ, पहा कधी कुठे पाहायला मिळणार सामना?

0
294
Women's T20 World Cup 2024: आज या देशाशी भिडणार भारतीय महिला संघ, पहा कधी कुठे पाहायला मिळणार सामना?
ad

Women’s T20 World Cup 2024: टी20 महिला विश्वचषक 2024 (Women’s T20 World Cup 2024) सुरू झाला आहे. पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात झाला. तर आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ  न्यूझीलंडशी (IND W vs NZ W) भिडणार आहे.

भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड संघ यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. मात्र, त्याआधी दोन्ही संघांच्या नुकत्याच झालेल्या आणि हेड-टू-हेड कामगिरीवर एक नजर टाकूया.

Women's T20 World Cup 2024: आज या देशाशी भिडणार भारतीय महिला संघ, पहा कधी कुठे पाहायला मिळणार सामना?

Women’s T20 World Cup 2024: कोणता संघ आहे सरस?

भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीवर नजर टाकली तर,मेन इन ब्लूची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भारताने 2018 आणि 2023 मध्ये महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

याशिवाय 2020 मध्ये भारत मेगा इव्हेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. न्यूझीलंडची आकडेवारी निराशाजनक आहे. किवी संघ 2016 पासून टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

किवी संघाची अलीकडची कामगिरीही खराब झाली आहे. न्यूझीलंडला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडची भारताविरुद्धची कामगिरी दमदार राहिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (ind w vs nz w) यांच्यात झालेल्या सामन्यात आकडेवारी भारताच्या बाजूने नाही. कारण भारतीय महिला संघ 2009 ते 2022 या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या 13 पैकी केवळ 4 सामने जिंकू शकला आहे. संघाला 9 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र जबरदस्त फॉर्मात असलेला भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यास सक्षम आहे.

T-20 विश्वचषक 2024 साठी दोन्ही संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, साजवान पाटील. .

Women's T20 World Cup 2024: आज या देशाशी भिडणार भारतीय महिला संघ, पहा कधी कुठे पाहायला मिळणार सामना?

न्यूझीलंड: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली तहहू .


हेही वाचा:

Happy Birthday Rishabh Pant: अभिनेत्री उर्वशी रौतेला नाही तर, या महिलेसोबत आहेत ऋषभ पंतचे प्रेमाचे संबंध, दिसते उर्वशी पेक्षाही जबरदस्त..

आता त्या गोष्टीची वेळ आली आहे..” कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबर आझमने केले मोठे वक्तव्य..