Women’s T20 Worldcup 2024: बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील परिस्थिती चांगली नाही आहे. त्याचा फटका आता क्रिकेटवरही पडू लागला आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
वृत्तानुसार, ही स्पर्धा आता बांगलादेशऐवजी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित केली जाऊ शकते. ICC लवकरच याबाबत अधिकृत निवेदन जारी करू शकते. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान टी-20 विश्वचषक स्पर्धा (Women’s T20 Worldcup 2024) होणार आहे. T20 विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघाने टी-20 विश्वचषकाची तयारीही सुरू केली आहे.
Women’s T20 Worldcup 2024: बांगलादेशात परिस्थिती चांगली नाही,क्रिकेटवर देखील परिणाम.
बांगलादेशात जुलै महिन्यात आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले. या निदर्शनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. सत्तापालटानंतर बांगलादेशातील परिस्थिती सुधारलेली नाही. देशभरात हिंसाचार उसळला आहे. तेथे हिंदूंसह अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे.
अशा परिस्थितीत 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयसीसी तिथल्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. तेव्हापासून आयसीसी नवीन यजमान देशाच्या शोधात आहे. झिम्बाब्वेनेही महिला टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले होते.
वृत्तानुसार, मंगळवारी (20 ऑगस्ट) आयसीसीची आभासी बोर्ड बैठक झाली. या बैठकीत देशांनी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. मात्र, आयसीसीने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?