आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु सर्व खेळात जास्त वर्चस्व हे क्रिकेट खेळाचे आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट प्रत्येकालाच आवडते. तसेच युवा पिढी क्रिकेट कडे जास्त आकर्षित होताना आपल्याला दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्व संघापैकी उत्तम संघ म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या देशात अनेक आक्रमक फलंदाज आणि गोलंदाज होऊन गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगला फॉर्म देणे हे कोणत्याही गोलंदाजसाठी सोपे नसते. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजांना आणखी अडचणी येतात. जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक महान गोलंदाज झाले आहेत ज्यांनी एका डावात ५ बळी घेतले आहेत. अश्या जबरदस्त खेळी करणारे गोलंदाज सुद्धा आहेत जे काही सेकंदातच सामना बदलू शकतो.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या गोलंदाजाबद्दल सांगणार आहे ज्याने चक्क 0 धावा देऊन 4 बळी घेतले आहेत तर चला तर जाणून घेऊया कोण आहे हा खेळाडू.
दक्षिण आफ्रिका संघातील महिला क्रिकेटपटू, डेन व्हॅन निकेर्क, जिने 2017 च्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला क्षेत्ररक्षणाची निवड केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिज संघाला दणदणीत पराभव दिला.
सुरुवातीला फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 50 धावांचा टप्पा सुद्धा पार करू शकला नाही आणि 25.2 षटकात केवळ 48 धावा करून गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात मारिजाने कॅप आणि डॅन व्हॅन निकेर्क यांनी शानदार गोलंदाजी करताना 4-4 विकेट घेतल्या होत्या अत्यंत तुफानी गोलंदाजी करत या दोघींनी वेस्ट इंडीज संघाला धूळ चारली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कॅप्टन ही डेन व्हॅन निकेर्क होती. तिने या सामन्यात वेस्ट इंडिज विरोधात खेळत असताना 3.2 षटकात 0 धावा देत 4 बळी घेत क्रिकेट इतिहास घडवला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 0 धावांत 4 बळी घेणारी डेन व्हॅन निकेर्क ही पहिली महिला क्रिकेटर ठरली. तेव्हापासून आजतागायत तो विक्रम कोणीही मोडू शकले नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यात अवघ्या 38 चेंडूत 10 गडी बाद केले. आणि वेस्ट इंडिज संघाला धूळ चारून विजय आपल्या नावी केला होता.