World Cup 2023: अफगाणिस्तानने शेवटच्या सामन्यात रचला विक्रम, भारताच्या 2011 च्या या विक्रमाशी केली बरोबरी..

World Cup 2023: अफगाणिस्तानने शेवटच्या सामन्यात रचला विक्रम, भारताच्या 2011 च्या या विक्रमाशी केली बरोबरी..

World Cup 2023: ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 (CWC 2023) मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी जबरदस्त होती. हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आणि काही दिग्गजांनी त्याला भारतानंतरचा दुसरा सर्वोत्तम आशियाई संघ म्हटले.

शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी, अफगाणिस्तानला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.असे असूनही अफगाणिस्तानने एक विक्रम आपल्या नावावर केला, जो सध्याची स्पर्धा संपल्यानंतरही त्यांच्या नावावर राहील.

World Cup 2023: अफगाणिस्तानने शेवटच्या सामन्यात रचला विक्रम, भारताच्या 2011 च्या या विक्रमाशी केली बरोबरी..

World Cup 2023:  अफगानिस्ताच्या गोलंदाजांच्या नावे झाला हा खास विक्रम..

अफगाणिस्तान संघाची ताकद नेहमीच त्यांची फिरकी गोलंदाजी राहिली आहे आणि त्यामुळेच त्यांनी चालू विश्वचषकातही त्यांच्यावर बाजी मारली आहे. राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान या त्रिकुटाने बहुतांश सामन्यांमध्ये आघाडी घेतली होती, तर गेल्या काही सामन्यांमध्ये नूर अहमदही आपली जादू दाखवताना दिसला. अशाप्रकारे आपल्या फिरकीपटूंच्या बळावर अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक फिरकी गोलंदाजीचा विक्रम केला.

अफगाणिस्तानने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत फिरकी गोलंदाजांद्वारे 268.5 षटके टाकली, जी आता एकाच आवृत्तीतील सर्वोच्च विक्रम आहे. याआधी हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता, ज्याने 2011 च्या विश्वचषकात स्पिनर्सकडून 251 षटके टाकली होती. या बाबतीत श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. 2003 च्या विश्वचषकात श्रीलंकेने आपल्या फिरकी गोलंदाजांकडून 233.1 षटके टाकली होती.

World Cup 2023 :  राशिद खान ठरला अफगाणिस्तानचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज .

World Cup 2023 : अफगाणिस्तानी फिरकीपट्टू पुढे साहेबांनी टेकले गुडघे: पराभव लागला इंग्लंडच्या जिव्हारी..

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानसाठी राशिद खान हा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज होता. राशिदने अपेक्षेएवढ्या विकेट घेतल्या नाहीत पण तरीही तो त्याच्या संघातील इतर फिरकीपटूंपेक्षा सरस होता. त्याने नऊ सामन्यांमध्ये 86.3 षटके टाकली आणि 35.27 च्या सरासरीने 11 बळी घेतले. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ४.४८ होता.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *