World Cup 2023: विराट- राहुलच्या जोडीने रचला मोठा विक्रम, ऑस्ट्रोलीयाला पराभूत करताच जोडी झाली खास यादीत सहभागी..

0

World Cup 2023: विराट- राहुलच्या जोडीने रचला मोठा विक्रम, ऑस्ट्रोलीयाला पराभूत करताच जोडी झाली खास यादीत सहभागी..


World Cup 2023: विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा 5 वा सामना काल भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यामध्ये खेळवला गेला. २०२३ च्या विश्वचषकात (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ एकेकाळी अडचणीत सापडला होता. दोन धावावर तीन खेळाडू शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. येथून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डावावर नियंत्रण तर ठेवलेच शिवाय भारताला विजयाच्या अगदी जवळ नेले.  या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची उत्कृष्ट भागीदारी करत इतिहास रचला. यासह दोघांनी 27 वर्ष जुना विक्रमही मोडला.नंतर केल  राहुलने हार्दिक पंड्याच्या साथीने सामना जिंकला.

खरं तर, एकदिवसीय विश्वचषकात (World Cup 2023)चौथ्या किंवा त्याहून कमी विकेटसाठी भारतासाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. या जोडीने 1996 च्या विश्वचषकात विनोद कांबळी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेला भागीदारीचा विक्रम मोडला. दोघांच्या या भागीदारीमुळे टीम इंडियाचा खेळ सोपा झाला आणि भारताचा विजय निश्चित झाला. या दोघांनी 2 धावांत तीन विकेट घेत संघाला पुढे नेले. राहुलने नाबाद 97 धावा केल्या तर विराटने 85 धावांची खेळी केली.

एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी चौथ्या किंवा त्याहून कमी विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी

196 नाबाद – एमएस धोनी, सुरेश रैना विरुद्ध झिम्बाब्वे, 2015
165- विराट कोहली, केएल राहुल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023*
142- विनोद कांबळी, नवज्योतसिंग सिद्धू विरुद्ध झिम्बाब्वे, 1996
141- अजय जडेजा, आरआर सिंग विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1999

World Cup 2023

केएल राहुल- विराट कोहलीने मिळवून दिला भारताला मोठा विजय.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियन संघ 199 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यानंतर राहुल आणि कोहलीच्या खेळीमुळे संघ स्थिर झाला. अखेर भारताने 4 विकेट्स गमावून 42 व्या षटकातच सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे.


PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

Leave A Reply

Your email address will not be published.